Punjab Sangrur Jail: चार कैदी एकमेकांशी भिडले, गंभीर दुखापतीमुळे दोघांचा मृत्यू
Punjab Police PC ANI

 Punjab Sangrur Jail: पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.   या हाणामारीत दोन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा तुरुंगात हाणामारी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस या घटनेची कसून तपास घेत आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. हेही वाचा- महानदीत बोट उलटली, एकाचा मृत्यू, बचाव कार्य सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, संगरुर तुरुंगात काही कैद्यांमध्ये आपापसात मारामारी झाली होती. त्यात चौघे जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. शासकिय रुग्णालयात तपासा दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर अन्य दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. त्यांना राजेंद्र रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. मारामारीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तुरुगांत कैद्यांनी मारामारी का केली त्यामुळे पोलिस देखील संभ्रमात पडले आहे.

पोलिस घटनास्थळावर दाखल होऊन मारामारीचे कारण शोधत आहे. पोलिसांनी अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. हर्ष आणि धर्मेश असं दोन कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर मारहाण झाली असल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. गगनदिप सिंग आणि मोहम्मद शाहबाज यांना गंभीर दुखापत झाली.