Banda Shocker: मैत्रीचा बलात्कार करून पूलावर खाली फेकले, गुन्हा दाखल, उत्तर प्रदेशातील बांदा येथील घटना
उत्तर प्रदेशातील बांदा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.२१ वर्षीय महिलेचा बलात्कार करून तीला पूलावरून खाली फेकले. पीडित महिलेने आरोप केला की, आरोपीने ब्लॅकमेल करून बलात्कार केला
Banda Shocker: उत्तर प्रदेशातील बांदा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.२१ वर्षीय महिलेचा बलात्कार करून तीला पूलावरून खाली फेकले. पीडित महिलेने आरोप केला की, आरोपीने ब्लॅकमेल करून बलात्कार केला आणि त्यानंतर ओव्हरब्रिजवरून खाली फेकले. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीविरुध्दात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन मुख्य आरोपीसह त्याच्या मित्राला अटक केले आहे. (हेही वाचा- '...अन्यथा डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू'- ममता बॅनर्जी)
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा मित्र सलमान याने तिच्यावर बलात्कार करून तिला ब्रिजवरून खाली फेकले. दोघांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, सोमवारी पहाटे ब्रिजवरून महिला खाली पडल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलिस अधिक्षक अंकूर अग्रवाल यांनी सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी दोघे ही मित्र होते. आरोपीचे नाव सलमान आहे. रविवारी सलमानने मैत्रिणीलादुसऱ्या मित्राच्या घरी बोलावून घेतले. रात्री त्याने तीच्यावर बलात्कार केला आणि सोमवारी पहाटे तीला ओव्हरब्रिजवरून खाली फेकले. पोलिसांने सांगितले की, या प्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यातून असे समोर आले की, महिला रविवारी सलमानला भेटायला त्याच्या मित्राच्या घरी गेली. सोमवारी पहाटे घरी परतत असताना त्यांच्यात वाद झाला. तीनं उड्डाणपूलावरून उडी मारली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 9773 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

