Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

Kolkata Rape Case:  कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये(RG Kar Medical College) 31 वर्षीय डॉक्टरवर शनिवारी बलात्कारकरून तिची हत्या (Kolkata Rape and Murder Case)करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जा यांनी मोठं विधान केलं आहे. 'तपास पूर्ण करण्यासाठी राज्य पोलिसांकडे रविवारपर्यंत वेळ असेल, तपास पूर्ण न झाल्यास सीबीआय या प्रकरणाचा ताबा घेईल', असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले. 'जर आणखी आरोपी असतील आणि रविवारपर्यंत सर्वांना अटक झाली नाही. तर, आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू,' असे मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सांगितले. (हेही वाचा: Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा)

'प्रकरणे सोडवण्याचा सीबीआयचा यशाचा दर कमी असला तरी आम्ही हे प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द करू,' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिकाच्या चोरीसारख्या खटल्यांचा उल्लेख यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला. जे प्रकरण सीबीआयला आजपर्यंत सोडवता नाही. 'जर आंदोलक विद्यार्थ्यांना दुसऱ्या एजन्सीमार्फत चौकशी करायची असेल तर आमचा त्याला विरोध नाही,' असेही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून योग्यती पावले उचलली जात असल्याचे म्हटले आहे.'आम्हाला खात्री आहे, येत्या चार-पाच दिवसांत आणखी दोषी आढळल्यास त्यांना अटक करू,' त्यासाठी त्यांनी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. ज्याद्वारे डॉक्टर कॉल करून माहिती देऊ शकतात किंवा निर्भीडपणे संवाद साधू शकतात.

प्राचार्यांचा राजीनामा

या घटनेनंतर आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीमाना दिला. 'सोशल मीडियावर माझी बदनामी होत आहे. याप्रकरणात ज्या डॉक्टरचा मृत्यू झाला ती माझ्या मुलीसारखी होती. त्यामुळे पालक असल्याच्या नात्याने मी राजीनामा देत आहे. असे प्रकार भविष्यात कधीच घडू नयेत असं वाटतं. तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. पण अखेर तिचा मृत्यू झाला', असं डॉ. संदीप घोष म्हणाले.