Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा

कोलकाता मध्ये सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी सोमवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा
Photo Credit-X

Kolkata Rape Case : कोलकाता मध्ये सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात (Kolkata Rape Murder Case)मोठ्या घडामोडी घडत आहेत. देशभरात या घटनेचा निषेध होत असताना. ताज्या घटनेत आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष (Principal Sandeep Ghosh Resign)यांनी सोमवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांच्यावर टीका होत होती. देशभरात इतर डॉक्टरांनी संप पुकरला आहे. हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अशा घटना पुन्हा घडू नये, याकरता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (हेही वाचा: Doctors Strike: कोलकातामध्ये डॉक्टरच्या हत्येचा निषेधात उद्या देशभरात डॉक्टरांचा संप)

प्राचार्यांची प्रतिक्रिया

“सोशल मीडियावर माझी बदनामी होत आहे. याप्रकरणात ज्या डॉक्टरचा मृत्यू झाला ती माझ्या मुलीसारखी होती. त्यामुळे पालक असल्याच्या नात्याने मी राजीनामा देत आहे. असे प्रकार भविष्यात कधीच घडू नयेत असं वाटतं. तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. पण अखेर तिचा मृत्यू झाला”, असं डॉ. संदीप घोष म्हणाले. (हेही वाचा:Kolkata Junior Doctor’s Death: कोलकत्त्यात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह )

शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय डॉक्टर मृतावस्थेत आढळली. हाती आलेल्या अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सखोल चौकशीची मागणी केली. देशभरात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. अटक होताच आरोपीने फाशीची मागणी केली.

पोस्ट पहा

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत डॉक्टरच्या डोळ्या, नाक आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. तिची मानही तुटलेली आढळून आली. तिच्या शरीराच्या इतर भागावरही जखमा होत्या. दरम्यान, सोमवारी पश्चिम बंगालमधील अनेक रुग्णालयात ज्युनियर डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींनी सलग चौथ्या दिवशी संप सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2024 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).