Disha Parmar (Photo Credits: YouTube)

दरवर्षी वादाच्या भोव-यात अडकलेला पण तितकाच लोकप्रिय असलेला बिग बॉस (Bigg Boss) शो मध्ये दरवर्षी काही ना काही तरी भन्नाट गोष्टी घडत असतात. नुकताच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या झालेल्या भागामध्ये या कार्यक्रमातील स्पर्धक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याने नॅशनल टेलिव्हिजनवर सर्वांसमोर त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार (Disha Parmar) हिला लग्नाची मागणी घातली. त्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून सर्वांनाच ही दिशा परमार नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न पडला आहे. गोड आवाजामुळे आणि चांगली पर्सनॅलिटीमुळे राहुल वैद्य अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र त्यात राहुलनेच एका तरुणीला टीव्हीवर सर्व जगासमोर लग्नाची मागणी अनेक तरुणींची हृदय तुटून गेले आहे.

मात्र सर्वांना राहुलची ही गर्लफ्रेंड दिशा परमार नक्की आहे तरी कोण हा प्रश्न निर्माण झाला असून तिच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

जाणून घ्या दिशा परमार हिच्याबद्दल काही खास गोष्टी:

1. दिशा परमार एक मॉडेल असून तिने 'प्यार का दर्द है मीठा मीठा' या हिंदी मालिकेत काम केले आहे.

2. राहुल वैद्य ने दिशा परमार सोबत 2019 मध्ये एक अल्बम केला होता. त्यातील 'याद तेरी' या गाण्यात त्या दोघांनी एकत्र काम केले होते. यावेळी त्यांच्यातील केमिस्ट्री लोकांनी प्रचंड पसंत केली. हिच राहुल आणि दिशाची पहिली भेट होती.

3. त्यानंतर हळूहळू त्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

4. दिशा ला जेव्हा पहिली मालिका मिळाली होती तेव्हा ती 17 वर्षांची होती. यामुळे तिने आपले शिक्षण देखील अर्ध्यावर सोडले होते.

5. दिशाला जिम करणे, पुस्तके वाचणे आणि गाणी ऐकायला फार आवडतात.

दिशासोबत मैत्रीचे प्रेमात झालेले रुपांतर यामुळे राहुल आणि दिशा एकमेकांच्या अधिक जवळ आले. म्हणूनच घरापासून आणि तिच्यापासून दूर असलेल्या राहुलने काल ऑन एअर सर्वांसमोर दिशाला लग्नाची मागणी घातली. यामुळे दिशाचे काय उत्तर हे लवकरच कळेल. सध्या बिग बॉस 14 चा सीजन चांगला लोकप्रिय होत असून यातील स्पर्धक देखील प्रेक्षक पसंत करत आहेत.