Rahul Vaidya, Disha Parmar (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)  चा आजचा म्हणजेच 11 नोव्हेंबरचा एपिसोड हा यंदाचा सीझनच्या एपिसोडपैकी एक खूप खास एपिसोड होणार आहे. कारण या शोच्या जारी करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये त्याची रोमॅन्टिक झलक पहायला मिळत आहे. दरम्यान बिग बॉसमध्ये यंदा स्पर्धक म्हणून सहभागी राहुल वैद्य (Rahul Vaidya) त्याची खास मैत्रिण दिशा परमार (Disha Parmar) हीला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. बिगबॉस 14 च्या आजच्या प्रोमो व्हिडिओ मध्ये राहुल गुडघ्यावर बसून दिशा परमारला प्रपोज करणार आहे. त्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांसमोर ,' माझ्या आयुष्यात एक खास व्यक्ती आहे. तिचं नाव दिशा परमार आहे. मला तुला या भावना सांगायला इतका वेळ का लागला हे मला माहित नाही... पण तू माझ्याशी लग्न करशील का? मी उत्तराची वाट बघतोय' असा मेसेज राहुलने दिला आहे. Bigg Boss 14 च्या घरात मराठमोळा राहुल वैद्य; जाणून घ्या इंडियन ऑयडल फेम गायकाबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी!

बिग प्रोमो व्हिडिओ

राहुल वैद्य हा पेशाने गायक आहे. पहिल्या इंडियन आयडॉलचा तो रनर अप होता. त्यानंतर त्याने काही रिअ‍ॅलिटी शो केले आहेत. काही अल्बम आणि सिनेमांसाठी पार्श्वगायनही केले आहे. आता तो बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आला आहे.

राहुलचा प्रोमो आऊट होताच आता सोशल मीडीयावर दिशाची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. यामध्ये ट्विटरवर दिशा परमार ट्रेंड होत आहे. दिशा ही हिंदी अभिनेत्री असून 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेत तिने पंखुरीची भूमिका साकारली आहे. तसेच तिने राहुल वैद्य सोबत एका अल्बम मध्येही काम केले आहे.