बिग बॉस 14 (Bigg Boss 14 )सीझनची दमदार सुरूवात झाली आहे. बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा या शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये आहे. दरम्यान शनिवार, 3 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या रिअॅलिटी शोच्या स्पर्धकांमध्ये मराठमोळ्या राहुल वैद्य (Rahul Vaidya) याचा देखील समावेश आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी इंडियन आयडॉल या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो मधून राहूल रसिकांच्या भेटीला आला होता. दरम्यान त्यानंतर आता राहुल वैद्य पुन्हा बिग बॉस या बहुचर्चित शो मधून पुन्हा वेगळ्या अंदाजात रसिकांच्या भेटीला आला आहे. इंडियन आयडल ते बिग बॉस या काळात नेमकं राहुल वैद्य ने काय काय केलं? त्याचं बालपण कसं होतं? याविषयी तुमच्या मनात उत्सुकता आहे ना? मग जाणून घ्या राहुल वैद्य या बिग बॉस मधील स्पर्धकाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी!
राहुल वैद्य बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी
- राहुल वैद्य हा इंडियन आयडल सीजन 1 मध्ये सहभागी होता. तो हा शो जिंकू शकला नसला तरीही त्याच्या गाण्याची, आवाजाची आणि स्मार्ट लूक ची रसिकांमध्ये विशेष क्रेझ होती.
- राहुल वैद्य हा मुंबईमध्ये जन्मला आणि इथेच मोठा झाला. त्याला संगीताचे धडे लोकप्रिय मराठी, बॉलिवूड गायक सुरेश वाडकर आणि त्यांच्या पत्नी पद्मा वाडकर यांनी दिले आहेत.
- लहानपणी देखील राहुल वैद्य अनेक गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला होता.
- इंडियन आयडल 1 जिंकल्यानंतर राहुल वैद्य नंतर 'तेरा इंतजार' या त्याच्या पहिल्या अल्बम मधून रसिकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ' जो जीता वही सुपरस्टार' या सिंगिंग रिअॅलिटी शो मध्ये तो सहभागी झाला आणि विजेता ठरला.
- भाग जॉनी, क्रेझी 4 या बॉलिवूड सिनेमांच्या गाण्यांसाठी त्याने पार्श्वगायन केले आहे.
- चॉकलेट बॉय इमेज असलेला मराठमोळा राहुल वैद्य पुढे अल्का याज्ञिक यांची मुलगी Syesha Kapoor सोबत रिलेशनशीप मध्ये होता अशादेखील चर्चा होत्या. मात्र सायशा सोबत लिंक अपच्या बातम्या खोट्या असल्याचं त्याने मीडीयाशी बोलताना सांगितलं आहे.
- राहुलचं नाव नंतर दिशा परमार सोबत जोडलं गेले होते यावर ईटाइम्स टीवी शी बोलताना राहुलने दिलेल्या माहितीनुसार आम्ही केवळ चांगले मित्र आहोत.
यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मध्ये फिजिकल टास्क होणार नाही. त्यामुळे ही वेळ बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी चांगली असल्याचं राहुल वैद्य ने म्हटलं आहे. दरम्यान कॅमेर्यासाठी अनावश्यक वाद टाळणार असल्याचंही राहुलने स्पष्ट केले आहे.