सौम्या टंडन हिच्यावर बनावट ID तयार करत लस घेतल्याचा आरोप, संतप्त झालेल्या अभिनेत्री ट्विट करत सांगितले सत्य
सौम्या टंडन (Photo Credits-Twitter)

टेलिव्हिजन वरील 'भाभी जी घर पर है' मधील अनीता भाभी म्हणेज सौम्या टंडन (Saumya Tandon)  हिच्यावर बनवाट आयडी (Fake ID) तयार करुन कोरोनावरील लस घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ठाणे महापालिका यांच्याद्वारे आयडी कार्डाचा तपास केल्यानंतर याचा खुलासा झाला आहे. आरोप असा आहे की, अभिनेत्रीने एका आरोग्य कर्मचाऱ्याचा आयडी तयार करुन लस घेतली होती. ऐवढेच नव्हे तर तिच्या विरोधात एफआयआर सुद्धा दाखल करण्याची वेळ आली होती. मात्र आता सौम्या टंडन हिने ट्विट करत या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.(The Family Man Season 2 संपूर्ण सिरीज TamilRockers आणि Telegram वर लीक; मनोज बाजपेयी ची वेबसिरीज पायरसीच्या विळख्यात?)

कोईमोईच्या रिपोर्ट्सनुसार, सौम्या टंडन वर आरोप लावण्यात आला की, त्यांनी कोणत्यातरी आरोग्य कर्मचाऱ्याचा बनावट आयडी तयार केला. त्यानंतर ठाणे येथे कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला. तसेच असे ही समोर आले की, 45 वयाच्या खालील 21 लोकांचे फेक रुपात लसीकरण झाले आहे. हे सर्वजण कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड कलाकारांशी जोडले आहेत.

यावर आता सौम्या टंडन हिने सोशल मीडियात स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. तिने असे म्हटले की, हे खोटे असून मी कोणताही बनावट आयडी तयार केलेला नाही. पुढे असे तिने म्हटले की, पहिला डोस मी घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्रावरुन घेतला आहे. त्यामुळे अशा कोणत्याही बनावट बातम्यांना बळी पडू नका.(Taapsee Pannu ने कोविड 19 संकटात जीवाची बाजी लावणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा हृद्यस्पर्शी व्हिडिओ शेअर करत दिला घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला)

Tweet:

दरम्यान, लसीच्या कमतरतेमुळे संकट पाहता सध्या 18 ते 44 वर्ष वयातील व्यक्तींसाठी लसीकरण थांबवण्यात आले आहे. तर 45 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्यांना सध्या लस मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.