Shailesh Lodha: 'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष, निर्मात्याने दिले उत्तर
Photo Credit - Twitter

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या कॉमेडी शोचे चाहते बर्‍याच दिवसांपासून नाराज आहेत कारण त्यांना या शोचे स्टार्स दिसणार नाहीत अशी बातमी मिळाली आहे. माहितीनुसार तारक मेहताची भूमिका साकारणारा शैलेश लोढा (Shailesh Lodha) लवकरच या शोला अलविदा करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. पण आता या प्रकरणी शोच्या निर्मात्याचे उत्तर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक बातम्या समोर येत आहेत, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'दयाबेन'नंतर आता 'जेठालाल'चे संकट दुर करणारा त्याचा खास मित्र तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढाही या शोचा निरोप घेणार आहे. असेही सांगितले जात आहे की, शैलेश लोढा लवकरच एका नवीन शोमध्ये दिसणार आहे आणि त्यामुळेच त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शोचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनीही या प्रकरणावर मौन तोडले आहे.

असित मोदींनी सांगितली ही अफवा आहे

तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी यांनी शैलेश लोढा शो सोडल्याबद्दल मौन तोडले आहे. एका मुलाखतीत बोलताना, तारकने शो सोडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आणि त्याला केवळ अफवा म्हटले. ते म्हणाले की, शैलेश लोढा किंवा मी या दोघांनीही याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. असित मोदी म्हणाले की, अफवा पसरवणारे हे सूत्र कोण आहेत हे मला समजत नाही. असे काही घडले तर सर्वांना माहिती दिली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शैलेश यांनी शेअर केली पोस्ट

शैलेश लोढा शो सोडण्याच्या बातम्यांदरम्यान, त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हसीब सोज़ साहब का एक शेर कमाल का है "यहाँ मज़बूत से मज़बूत लोहा टूट जाता हैकई झूठे इकठ्ठे हों, तो सच्चा टूट जाता है  शैलेश यांच्या या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)