शेवंता फेम Apurva Nemlekar हिच्या आवाजातील 'आज जाने की जिद ना करो' गाण्याने चाहते होतील घायाळ, Watch Video
Apurva Nemlekar (Photo Credits: Instagram)

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले 2' (Ratris Khel Chale 2) मधील घराघरात पोहोचलेली शेवंता (Shevanta) ऊर्फ अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने अवघ्या तरुणाईला वेडं लावलं. त्याच्या त्या नखरेल अदा, मादक नजर हे सर्वच प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केले. त्यामुळे मालिका संपूनही तिची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. ज्यांना ती टीव्हीवर पाहायला मिळत नाही असे तिचे चाहते तिला सोशल मिडियाच्या माध्यमातून फॉलो करत आहेत. त्यामुळे अपूर्वाही आपल्या चाहत्यांना प्रचंड मिस करत असून ती सुद्धा सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असते.

नुकताच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिच्या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती छान काळ्या रंगाची ओढणी डोक्यावर ओढून 'आज जाने की जिद ना करो' हे सुंदर गाणे गात आहे. या गाण्यात तिच्या दिलखेचक अदा पाहून तिने छान मैफिल रंगवली आहे असे म्हणायला हरकत नाही. Apurva Nemlekar Glamorous Photos: 'रात्रीस खेळ चाले 2' मधील शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर हिच्या याआधी कधीही न पाहिलेल्या ग्लॅमरस अदा एकदा पाहाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

अपूर्वाचे चाहते ती रोज काय करते हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. कारण शेवंता या पात्राने तिला मिळवून दिलेली प्रसिद्धीही तितकीच मोठी होती. त्यामुळे ती सुद्धा सोशल मिडियावर कधी आपले ग्लॅमरस फोटोशूट शेअर करते तर कधी रेसिपीज व्हिडिओ. अशा या ना त्या कारणाने ती आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते