झी मराठी वाहिनीवर तुफान लोकप्रिय झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले 2' (Ratris Khel Chale 2) मधील शेवंता (Shevanta) आणि अण्णा नाईक (Anna Naik) हे पात्र देखील तितकेच गाजले. सोशल मिडियावर तर त्यांच्यावर मिम्स देखील बनवले जाऊ लागले. यात शेवंता हे पात्र साकारणारी मादक डोळ्यांची अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिला तिचे चाहते प्रचंड मिस करतायत. शेवंता या नावानेच घराघरात पोहोचलेली अपूर्वाने अनेक मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अपूर्वा सोशल मिडियावरही (Social Media) बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.
या फोटोमधील तिच्या मादक आणि हॉट अदा एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीलाही मागे टाकतील अशाच आहेत. या आणि अशा अनेक फोटोंच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना सतत खूश करत असते.
काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी मजेशीर चारोळ्या तयार केल्या होत्या. 'फळ्या फळा लाकडाचा फळा, शेवन्ता बाई कापताय भेदक नजरेनं लोकांचा गळा' पासून ते 'गरम गरम भजी खाऊन जीभ माजी भाजली शेवंता बाई चा फोटो बगून न्यानंदा पण लाजली' अशा मजेशीर चारोळ्या तयार केल्या आहेत.Apurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट
लॉकडाऊनमध्ये अपूर्वाने आपले अनेक रेसिपीजचे व्हिडिओ पण शेअर केले होते. अपूर्वाही सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस फोटोला कमेंट्सचा वर्षाव होणार नाही असं होणारच नाही.