भारतीय टेलीव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चे नाव घेतले जाते. सध्या या शोला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हा शो सतत चर्चेत असतो. बिग बॉसमधील प्रत्येक भागानुसार स्पर्धकांमधील ड्रामा वाढत असलेला दिसून येत आहे. अशात या शोने टीआरपीमध्येची बाजी मारली आहे. बिग बॉस 13 बद्दल प्रेक्षकांमध्ये वाढलेला उत्साह पाहून, निर्मात्यांनी हा शो आणखी काही दिवस वाढवायचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) हा शो सोडण्याची शक्यता आहे.
बिग बॉसचा कालावधी वाढवल्यामुळे जिथे बिग बॉस 13 चा फिनाले 12 जानेवारीला होणार होता, त्या ठिकाणी आता हा 16 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. मात्र सलमान खानने आपला आगामी चित्रपट ‘राधे’ साठी त्याच्या पुढील तारखा आधीपासूनच बुक केल्या आहेत. यामुळेच बिग बॉसचा कालावधी वाढला तर तो हा शो करू शकणार नाही. परिणामी अशा परिस्थितीत त्याला हा शो सोडावा लागेल. अशी परिस्थिती आल्यास बिग बॉस 13 चे होस्टिंग त्याची मैत्रीण फराह खान (Farah Khan) करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Big Boss 13 च्या चाहत्यांसाठी खुशखबर; शोचा कालावधी 3-4 आठवड्यांनी वाढण्याची शक्यता)
शोचा कालावधी वाढवण्याचा विचार झाल्यापासून सलमानच्या फीमध्ये दिवसाला 2 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. असे म्हटले जात आहे की, सलमान आता प्रत्येक भागासाठी साडेआठ कोटी रुपये घेईल, तर आधी तो त्यासाठी साडेसहा कोटी रुपये घेत असे. मात्र सलमानने आपल्या तारखा आधीच देऊन टाकल्या असल्याने त्याला हा शो सोडावा लागेल, व त्याची जागा फराह खान घेईल. दरम्यान, याआधी शोचा 8 वा सीझन देखील वाढविला गेला होता. त्यावेळीसुद्धा सलमान खानला शो सोडावा लागला होता आणि फराह खानने पुढे तो होस्ट केला होता.