PMC बँक घोटाळ्यामुळे 'या' अभिनेत्रीला घर चालवण्यासाठी विकावे लागले दागिने
Nupur Alankar (Photo Credits: Instagram)

अनेक सिने व टेलिव्हिजन कलाकारांच्या आयुष्यात चढ-उतार येतंच असतात. सध्या अनेक प्रश्नांना तोंड देत आपलं आयुष्य जगणाऱ्या अशाच एका अभिनेत्रीची खरी कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आगळे जनम मोहें बिटिया कीजो तसेच स्वरागिनी सारख्या हिंदी मालिकांमधून काम करणारी अभिनेत्री नुपूर अलंकार ही सध्या अनेक संकटांना तोंड देत आयुष्य जगात आहे. इतकंच नव्हे तर घर चालवण्यासाठी पैसे नसल्याने तिने तिचे दागिनेही विकले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Alankar (@nupuralankar) on

PMC या बँकेवर Reserve Bank ने लावलेल्या निर्बंधांमुळे नूपुरवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे तिने 'टाइम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत काबुल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Alankar (@nupuralankar) on

नुपूरने दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "मी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. माझे इतरही बँकेत खाते होते परंतु काही वर्षांपूर्वी मी त्यातील रक्कमसुद्धा PMC बँकेत ट्रान्स्फर केली होती."

"आमच्या घरात काहीच पैसे नाहीत. सगळेच बँकेत अडकले असल्याने घर चालवण्यासाठी दागिने विकण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. मी माझ्या सहकलाकारांकडून 3000 रुपये असणे घेतलेत तर माझ्यावर 50,000 रुपयांचे एकूण कर्ज झाले आहे, असं नुपूर म्हणते.