मराठी चित्रपटानंतर (Marathi Movies ) हिंदी मालिका विश्वात देखील आपल्या अभिनयाने व हॉट अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हि लग्नाच्या बेडीत अडकतेय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली दिसत आहे. खरतर नुकताच नेहाने एक फोटो पोस्ट केला होता ज्यामुळे नेहा लग्न करतेय आणि आता तिचा साखरपुडा झालाय या चर्चेची सुरवात झाली. माझ्या नवऱ्याची बायको मधील गुरुनाथ म्हणजे अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) याने नेहाचं अभिनंदन करत अलीकडे एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला ज्यात नेहा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत पोज देताना पाहायला मिळतेय.
मात्र थांबा, फॅन्सच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नेहा स्वतःच पुढे आली आहे, नेहाने इंडिया फोरम्स ला दिलेल्या माहितीनुसार तूर्तास तरी नेहाचा लग्न करण्याचा काहीही प्लॅन नाहीये. तसेच यंदाच्या मराठी बिग बॉस मध्ये देखील नेहाला पाह्यला मिळणार का यावर देखील तिने नकारार्थी उत्तर दिले आहे. या फोटो मध्ये माझे जवळचे मित्र आहेत आणि आम्ही बऱ्याच दिवसांपासून काहीतरी प्लॅन करत होतो ज्याच्या पूर्ण होताच आम्ही सेलिब्रेट करत असताना हा फोटो काढलेला आहे असं देखील नेहाने माध्यमांना सांगितले .
या पूर्वी नेहा पेंडसे हे नाव हिंदी बिग बॉसच्या माध्यमातून बरंच गाजलं होतं.त्यानंतर फॅन्सनी नेहाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे तसेच तिचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल याविषयी देखील तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.