Bigg Boss Marathi 2, 29 June, Episode 35 Updates: नेहाशी Partial होत महेश मांजरेकरांनी घेतली सर्वांची शाळा; झालेल्या कृत्याबद्दल पराग कान्हेरे ने दिले स्पष्टीकरण
Bigg Boss Marathi 2, 29 June, Episode 35 (Photo Credit : Colors Marathi)

कालच्या भागात कप्तानपदाच्या टास्कनंतर ज्या प्रकारे पराग आणि इतर सदस्य आक्रमक झाले ते पाहून, परागला बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला आपण पहिले. आजही या गोष्टीचे पडसाद सदस्यांच्या चर्चेत उमटलेले दिसतात. झालेल्या प्रकारामध्ये कोणाची चूक होती यावर जवळजवळ सर्वच सदस्य चर्चा करतात. त्यानंतर शिव नक्की कोणत्या टीममध्ये आहे? त्याचे वीणाशी नक्की काय चालू आहे? यामुळे वैशाली आणि अभिजित थोडे सांशक असलेले दिसतात. या सर्व प्रकारात वीणामुळे शिवकडून हीनाचा अपमान घडतो त्याच्यावर नेहा आणि हीना त्याच्यावर प्रचंड भडकतात. (इथे मुद्दाम ही टीम शिवच्या मनात वीणा बद्दल गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करत आहेत)

अखेर महेश मांजरेकारांची एन्ट्री होते, आल्या आल्याच ते शिव ला या आठवड्यातील सर्वात उत्कृष्ट प्लेयर घोषित करतात. त्यानंतर स्वर्ग आणि नरक या टास्कमध्ये घडलेल्या चुकांचा उजाळा घेतला जातो. रुपाली आणि परागच्या नात्याबद्दल वैशाली आणि नेहा किंवा इतर सदस्य जे काही बोलतात त्याबद्दल विचारणा केली जाते. त्यानंतर वादग्रस्त 'टिकेल तो टिकेल; या टास्कबदल शाळा घ्यायला सुरुवात होते. नेहाला तिच्या कृत्याबद्दल समज दिल्यानंतर, त्या टास्कमध्ये नक्की काय घडले याबाबत सदस्यांना विचारणा केली जाते. (नेहा बद्दल मांजरेकर पूर्णतः पार्शल असल्याचे दिसते. नेहाने इतक्या मोठ्या चुका केल्यानंतरही नेहाला काहीच बोलले जात नाही)

इथे सर्वात मोठी चूक सुरेखा यांची असल्याचे जाणवते, त्यांनी वेळेत सदस्यांना थांबवले असते तर हे सर्व घडले नसते. त्याबद्दल त्यांना समज दिली जाते, आणि पुढे संचालक ठोस निर्णय घेतील असे सांगितले जाते. पुढे मनोरा विजयाच्या या टास्कमध्ये माधव ज्या प्रकारे किशोरीला बॉल मारत होता त्याबद्दल त्याला खडे बॉल सुनावले जातात.  (हेही वाचा: अखेर नेहा आणि वैशालीने माफ न केल्यामुळे पराग कान्हेरे बिग बॉसच्या घराबाहेर, वीणा ग्रुप बदलण्याचा मार्गावर)

त्यानंतर परागला सर्वांसमोर कटघऱ्यात बोलावले जाते. त्यावेळी स्पष्टीकरण देताना पराग, ‘जे काही घडले ते त्या क्षणात घडले, ज्याचा मी विचारही केला नव्हता. मी असा नाही, माझ्याकडून ते कृत्य चुकीमुळे घडले; असे सांगतो. हे बोलून तो पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. त्यानंतर एक एक करत सर्व सदस्य पराग कुठे आणि कसा चुकला, आम्हाला तो कुठे खटकला याबाबत बोलतात. इथे वीणा, रुपाली, किशोरी आणि पराग यांच्या ग्रुपमध्ये नक्की काय समस्या आहे, कसे सर्वजण परागच्या बोलण्याला भुलले आहेत त्याबद्दल बोलले जाते. त्यानंतर किशोरी, रुपाली, माधव, हीना, वीणा, नेहा असे सर्व पराग कुठे आणि कसा चुकला ते सांगतात. शेवटी सर्वांनी आपली मते मांडल्यावर पराग सर्वांशी संवाद साधतो. इथे सर्वप्रथम वैशालीने ज्या प्रकारे आपल्याला गुद्गुल्यांच्या नावाखाली बोटे खुपसली त्याबद्दल जाब विचारतो. मात्र वैशाली त्याचे म्हणते पुरतः खोडून काढते.