कालच्या भागात कप्तानपदाच्या टास्क साठी टीम A आणि टीम B मधील चढाओढ शिगेला पोहचते. परागला सिंहासनावरून उठवण्यासाठी नेहा, वैशाली, अभिजित, हीना, माधव अतिशय प्रयत्न करतात. प्रचंड टॉर्चर सहन केल्यानंतर अखेर पराग सिंहासनावरून खाली पडतो, त्यानंतर पराग ज्या प्रकारे चिडतो ते पाहून सर्व सदस्य आक्रमक होतात, ज्याची परिणती भांडणात होते. हे भांडण थांबल्यावर सर्वजण आपापल्या परीने नक्की काय आणि का घडले याबद्दल विचार मांडतात. त्यानंतर बिग बॉस सर्वांना एकत्र बोलावून जे काही घडले त्याचा निषेध करून, त्यासाठी परागला जबाबदार ठरवतात.
बिग बॉस कडून परागला त्या कृत्यासाठी निलंबित केले जाते. त्यावर नेहाचे मत विचारले असता ती, पराग कसा चुकीचे वागत आला आहे किंवा कसे चुकीचे खेळत आला आहे ते पाहता आपण त्याला माफ करू शकणार नाही असे सांगते. अखेर परागला घराबाहेर पडण्याची आज्ञा दिली जाते. पराग घराबाहेर पडल्यावर परत त्याच्यावर चर्चा सुरु होते. यामध्ये रुपालीला सर्वात जास्त वाईट वाटते, परागच्या सामानावर डोके ठेऊन ती ओक्साबोक्सी रडू लागते.
रात्री दोन्ही ग्रुप आता पुढे कसे वागायचे याबद्दल विचार करतात. परागच्या जाण्याने किशोरी, वीणा आणि रुपाली थोड्या एकट्या पडल्यासारख्या वाटतात. शेवटी घरातीत सर्व सदस्य नॉर्मल होऊन घरात पुन्हा मस्ती सुरु होते. पुन्हा एकदा वीणा आणि शिवचे प्रेम ऊतू जाऊ लागते. मात्र इथे वीणा आणि शिव चा गेमवरचा फोकस हलल्यासारखा दिसतो. यावर रुपाली जेव्हा वीणाला समजाऊ लागते त्यावेळी तिची फार चीडचीड होते. परत बिग बॉसकडून नव्या दोन करून, त्यांच्यासाठी शब्द ओळखा हा टास्क दिला जातो. या टास्कमध्ये आपल्या टीममधील सदस्याने बोर्डवर काढलेले चित्र इतर सदस्यांनी ओळखायचे आहे. यामध्ये दोन्ही टीम विजेत्या ठरतात.