ED Summoned Shiv Thakare: मनी लाँड्रिंग प्रकरणात शिव ठाकरेची ईडीकडून चौकशी; Abdu Rozik लाही पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Shiv Thakare

ED Summoned Shiv Thakare: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नुकतेच टेलिव्हिजन अभिनेता आणि बिग बॉसचा उपविजेता शिव ठाकरे याला चौकशीसाठी समन्स धाडले होते. तुरुंगात असलेल्या कथित ड्रग्ज लॉर्ड अली असगर शिराझीच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून शिवची चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील साक्षीदार ठाकरेचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ईडीने बिग बॉसचा स्पर्धक अब्दू रोझिक यालाही हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.

शिराझी याने हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली होती, ज्याने ‘Thakare Chai and Snacks’ सह अनेक स्टार्ट-अप्सना वित्तपुरवठा केला होता. रोझिकने हसलर्स हॉस्पिटॅलिटीसोबत भागीदारी करून ‘Burgiir; या बर्गर ब्रँडसह फास्ट-फूड स्टार्टअप सीनमध्येही प्रवेश केला. हसलर्सच्या माध्यमातून शिराझीने बुर्गीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा: Vidya Balan Lodged an FIR: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल)

माहितीनुसार, शिराझीचा नार्को व्यवसायात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे आणि रोजिक या दोघांनीही करार रद्द केला. दरम्यान याआधी, अंमली पदार्थ तस्कर अली असगर शिराझी याच्याशी जोडलेल्या खात्यांची चौकशी करताना, अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) अमली पदार्थांच्या तस्करीतून कमावलेल्या पैशाच्या मोठ्या ठेवी सापडल्या आहेत. केंद्रीय एजन्सी अंमली पदार्थांची तस्करी करणारा किंगपिन अली असगर शिराझी याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. शिराझी आणि त्याच्याशी संबंधित इतरांच्या बँक खात्यांमध्ये मोठी रोकड जमा करण्यात आल्याचे ईडीने उघड केले आहे, ज्याचा अंमली पदार्थांच्या विक्रीशी संबंध असल्याचे दिसत आहे.