Bigg Boss Marathi 2, Episode 79 Update:अभिजित बिचुकले यांना हट्टीपणा भोवला, कॅप्टनशिप स्पर्धेतून बाहेर; सर्वांना  मागे टाकत किशोरी आणि शिव ठरले दावेदार
Bigg Boss Marathi 2, Episode 79 Update (Photo Credits: Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2)  घरातील खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे, अशात कॅप्टनशिप म्हणजे एका आठवड्यासाठी निश्चिन्त ठेवू शकणारी जादूची कांडी आहे. ही संधी मिळवण्यासाठी आज घरातील सदस्यांना आपला कॅप्टनशिपचा दावेदार निवडायचा होता. मात्र यावेळी बिचूकलेंच्या (Abhijit Bichukle) हट्टीपणामुळे बिग बॉसनेच त्यांच्या हातातून ही संधी काढून घेतली. खरंतर घरात दिवसा कोणीही झोपायचे नाही हा नियम असतानाही बिचुकले मला शांती हवीये असं सांगून सतत अंथरुणात पडून होत, यावेळी नेहा (Neha Shitole)  कप्तान असल्याने तिने त्यांना अडगळीच्या खोलीत टाकेन असेही सांगितले पण बिचुकले कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. हा हट्टीपणा आणि नियमभंग केल्याचे शिक्षा म्हणून बिग बॉसने त्यांना स्वतःच कॅप्टनशिप स्पर्धेपासून अपात्र ठरवले.

या टास्क मध्ये घरातील सदस्यांनी त्यांच्यामते अपात्र सदस्यांच्या फोटोला काळं फासायचं होत. यामध्ये नेहा मागच्या आठवड्यातील बेस्ट खेळाडू ठरल्याने तिला फायदा देण्यात आला होता, ज्यानुसार सर्वात आधी कोणाला तरी या शर्यतीतून बाहेर काढण्याची नेहाकडे होती. तिने पहिल्याच फटक्यात हिनाच्या धसमुसळेपणाचं कारण देत तिला अपात्र ठरवलं. यापाठोपाठ शिवानी, नेहा, आरोह, वीणा हे सुद्धा शर्यतीतून बाहेर पडले अखेरीस शिव आणि किशोरी हे कॅप्टनशिपचे दावेदार ठरले आहेत.

दरम्यान, आजच्या भागाच्या बिचुकले आणि शिवानी सुरुवातीला बोलत असतात ज्यावेळी शिवानी त्यांना तुम्ही सतत अतिआत्मविश्वास दाखवू नका असा सल्ला देते त्यावरून त्यांच्यात काहीसा खटका उडतो. पण यावेळेस नेहमीसारखी आरडाओरडीची भांडणं न होता. शिवानी आणि शिव सह घरातील सदस्य बिचूकलेंची टेर उडवतात. शिअवनी तर त्यांची पँट स्विमिंग पूल मध्ये फेकायला जाते पण त्यावेळी बिचुकले वाटल्यास मला फेका पण पँट नको असे सांगतात. त्यावरून शिव त्यांनाच उचलून पूलमध्ये टाकायला जातो. यावेळेस घरातील सदस्य आणि बडबोले बिचुकले यांची जुगलबंदी बघून हसू आवरणार नाही. उद्याच्या भागात घरात कॅप्टन ठरवला जाईल त्यामध्ये काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला मराठी बिग बॉस मराठी 2!