Bigg Boss Marathi 2, 20 July, Episode 56 Updates: बिग बॉसच्या घरात आरोह वेलणकर याची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री, नेहा आणि माधव यांच्यावर राग व्यक्त करत मांजरेकर सरांनी केली दोघांची कानउघडणी
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits- Twitter)

Bigg Boss Marathi 2, 20 July, Episode 56 Updates: बिग बॉसच्या घरात रुपाली हिला कप्तदानपद दिल्यानंतर रोजच्या रोज भांडण होत असल्याचा उल्लेख अभिजित आणि वैशाली करतात. तर मर्डर मिस्ट्री टास्क खेळताना खुप मजा आली असे नेहा आपले मत बिग बॉसच्या कॅमेऱ्यासमोर सांगते. परंतु रुपाली सारखी शिवच्या पाठी कामासाठी सारखी लागली असल्याचा राग वीणा व्यक्त करते. त्यामुळे रुपाली आणि शिवच्या मध्ये वादाला सुरुवात होते. दुसऱ्या बाजूला शिव आणि अभिजतमध्ये काही कारणांवरुन बाचाबाची झाल्यानंतर स्वत: शिव येऊन त्याला सॉरी बोलतो. बिग बॉस अभिजतला कन्फेशनरुमध्ये बोलावत मर्डर मिस्ट्री दरम्यानचा अनुभव कसा होता याबद्दल भावना व्यक्त एक सांकेतिक खुन करण्यास सांगतात. मात्र त्याचसोबत त्याच्याकडे एक फोन देत त्याबद्दल गुप्तता पाळण्यास सांगतात.

अभिजीतला फोन येत नेहा, रुपाली किंवा शिवानी या तिघींमधील एकीचा खुन करण्यासाठी कोणाची तरी  वैयक्तिक वस्तू घराच्या छतावर फेकण्यास सांगितले जाते. त्यानुसार अभिजीत नेहाचा पाऊच घराच्या छतावर फेकून देत तिचा खून झाला असल्याची घोषणा बिग बॉसकडून केली जाते. त्यानंतर घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून रेगे सिनेमातून झळकलेला आरोह वेलणकर (Aroha Velankar) याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होते.

घरातील उत्तम स्पर्धक म्हणून शिवानी आणि फेअर परफॉर्मन्सचा किताब वीणा हिला महेश मांजरेकर देतात.  माधव सध्या घरात दादागिरी करत असल्याचे म्हणत हिना बरोबर झालेल्या भांडणावरुन जोरदार सुनावतात. तसेच हिनाला तुझे थोबाड फोडीन  या शब्दांवरुन महेश मांजरेकर नेहालासुद्धा सुनावतात.  तर रुपालीच्या नावाच्या टॅटूमुळे हिनाला बोलले जाते. तसेच आजच्या एपिसोडमध्ये नेहा आणि  माधव या दोघांच्या गेल्या एका आठवड्यात कसे वागले याचा कसून पाढा मांजरेकर वाचून दाखवतात. तसेच आरोहसुद्धा घरातील सदस्यांमध्ये एकता नाही अशी खंत व्यक्त करतो.

तसेच वीणा हिची मस्करी करत मांजरेकर तिच्याबद्दल कौतुक व्यक्त करतात. शिव याला तु कधी नीट या स्पर्धेत खेळायला शिकणार याबद्दल विचारतात. माधव याची  तर आजच्या दिवसात चांगलीच कानउघडणी केली गेली दिसून आले. तर उद्याच्या भागात शिव याला महेश मांजरेकर वीणा बाहेर जाणार का याची भीती वाटते का असे विचारत त्याला एक ऑप्शन देतात. त्यामध्ये वीणाला जर घरात पाहायचे असल्यास शिव तु घराबाहेर येण्यास तयार हो असा ऑप्शन देऊ करतात. त्यामुळे आता विकेंडच्या डावमध्ये नेमक्या काय घडामोडी होतात आणि कोण घराबाहेर जाणार हे  पाहणे उत्सुकतचे ठरणार आहे.