Bigg Boss 15 साठी Salman Khan चे मानधन ऐकून व्हाल थक्क; 14 आठवड्यांसाठी आकारले तब्बल 'इतके' कोटी
Salman Khan in Bigg Boss 15 (Image Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा आपला लोकप्रिय शो बिग बॉस (Bigg Boss) च्या होस्टिंग (Hosting) साठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही शो सुरु होण्यापूर्वी सलमान खानचे मानधन चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र यंदाचे सलमान मानधनाची रक्कम थक्क करणारी आहे. दरम्यान, सलमान खान मागील 11 सीजन पासून बिग बॉस शो होस्ट करत आहे. त्याची युनिक स्टाईल चाहत्यांना प्रचंड भावते. त्यामुळेच निर्माते सलमान खानला आपल्या शो मध्ये कायम ठेवण्यासाठी भरभक्कम रक्कम देण्यासाठी देखील तयार असतात.

लेटेस्ट रिपोर्टनुसार, बिग बॉस 15 च्या 14 आठवड्यांसाठी सलमान खान तब्बल 350 कोटी रुपये मानधन घेणार आहे. म्हणजेच एका आठवड्यासाठी सलमान खान 25 कोटी रुपये आकारत आहे. सध्या सलमानचे मानधन चर्चेत असले तरी यात किती तथ्य आहे याची कल्पना नाही. मात्र सलमानची लोकप्रियता पाहता निर्माते त्याच्यासाठी इतकी मोठी किंमत नक्कीच चुकवू शकतात. (Bigg Boss 15: सलमान खान च्या बिग बॉस शो मधील नवं घर कसं आहे? पहा Photo)

बिग बॉस ओटीटी शो मधील टॉप 3 स्पर्धक थेट बिग बॉस 15 मध्ये एन्ट्री घेतील. हा शो संपताच सलमान खान बिग बॉस 15 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दिव्या अग्रवाल ओटीटीचे विजेतेपद पटकावत ट्रॉफीसह 25 लाख रुपये जिंकले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या शो चे होस्टिंग करण जोहर करत होता.  दरम्यान, यंदाच शो नक्कीच खास असणार आहे. शो चे अनेक प्रोमोज समोर आले पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.