Bigg Boss 15: सलमान खान च्या बिग बॉस शो मधील नवं घर कसं आहे? पहा Photo
Salman Khan (Image Credit: Colors)

करण जोहर (Karan Johar) चा बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) हळूहळू प्रेक्षकांच्या मनांत आपले स्थान निर्माण करत आहे. तर शो मधील स्पर्धक आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यांच्याबद्दल सोशल मीडियात जोरदार चर्चा देखील सुरु आहे. दरम्यान, करण जोहर याचा हा शो केवळ 6 आठवडे ओटीटीवर राहणार आहे. त्यानंतर सलमान खान (Salman Khan) पूर्वीप्रमाणेच आपल्या बेधडक अंदाजात बिग बॉस शो टीव्हीवर होस्ट करेल. याची तयारी देखील निर्मात्यांनी सुरु केली आहे.

बिग बॉस 15 च्या सेटवरुन एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात घरामधील डायनिंग एरिया आणि किचन एरिया दिसत आहे. हे सलमान खानच्या बिग बॉस 15 चं घर असल्याचा दावा केला जात आहे. (Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटीमध्ये 'या' अवस्थेत पोहचला जीशान खान, ऍन्ट्री पाहून करण जोहरलाही बसला धक्का)

पहा फोटोज:

करण जोहर च्या बिग बॉस ओटीटी सुरु होऊन 2 आठवडे झाले आहेत. अजून 4 आठवडे बाकी आहेत. हे चार आठवडे संपताच सलमान खान बिग बॉस 15 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रेक्षकांची उत्सुकता मात्र आता शिगेला पोहचली आहे.

दरम्यान, बिग बॉस ओटीटी सुरु होण्यापूर्वी शो च्या घराचा व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमातून समोर आले होते. घरातील सिटिंग अरेंजमेंट, फर्नीचर, किचन, डायनिंग एरिया, गार्डन एरिया याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.