Jeeshan Khan (Photo Credit: Twitter)

बिग बॉस ओटीटीला (Bigg Boss) रविवारपासून सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री 8 वाजल्यापासून या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखवले जात आहे. दर्शकांना 24 तास हा कार्यक्रम वूटवर लाईव्ह पाहता येत आहे. यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक दिग्गजांनी ऍन्ट्री केली आहे. मात्र, सोशल मीडियावर जीशान खानच्या (Jeeshan Khan) ऍन्ट्रीची जोरदार चर्चा आहे. सध्या जीशान खानचा या शोमध्ये ऍन्ट्री करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत जीशान बाथरोब घालून ऍन्ट्री मारताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर शोचा होस्ट करण जोहरही (Karan Johar) स्तब्ध झाला आहे.

त्यानंतर, ज्या कपड्यांमध्ये तो दिसत आहे तो पाहून करण आणखी आश्चर्यचकित होतो. त्याची ऊर्जा पाहून करण त्याची तुलना रणवीर सिंगसोबत करतो. हे कळल्यावर झीशान आनंदाने उडी मारतो. तुम्हीही पाहा हा खास व्हिडिओ. हे देखील वाचा- Bigg Boss OTT आजपासून सुरु; करण जौहर चा घरात प्रवेश (Watch Video)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

यावेळी करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करणार आहेत. करणच्या मते, हा शो त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. कारण करणची आई आणि तो दोघांनाही शो खूप आवडतो आणि त्याचा एकही एपिसोड चुकवत नाहीत.