बिग बॉस (Bigg Boss) शो यंदा टीव्ही (TV) पूर्वी वूट (Voot) अॅपवर पाहायाला मिळणार आहे. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटीवर (Bigg Boss OTT) एक तासाच्या एपिसोड शिवाय शो मधील सर्व स्पर्धकांना 24 तास लाईव्ह पाहता येणार आहे. या नव्या शो विषयी प्रेक्षकांच्या मनांत प्रचंड उत्सुकता आहे. बिग बॉसचं घर कसं असेल? स्पर्धक कोण असतील? नियम काय असतील? काय वेगळेपण असेल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. यातच आता बिग बॉसच्या नव्या घराची (New House) झलक समोर आली आहे.
वूट अॅपने नव्या घराचा व्हि़डिओ शेअर केला असून त्याला 'आम्ही आरतीचं ताट घेऊन तयार आहोत', अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'कभी ख़ुशी कभी गम' हे गाणं वाजत आहे. या व्हिडिओतून बिग बॉसचं नवं घर खूपच आकर्षक असणार हे कळतंय. घरातील सिटिंग अरेंजमेंट, फर्नीचर, किचन, डायनिंग एरिया, गार्डन एरिया अतिशय सुरेख दिसत आहे.
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
टीव्हीवर येण्यापूर्वी 6 आठवडे आधीच हा शो वूट अॅपवर पाहायला मिळणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या शो चे होस्टिंग करण जोहर करणार आहे. याचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला असून 8 ऑगस्टपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.