भारतीय टीव्हीचा जगातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) टीव्हीच्या आधी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 8 ऑगस्टपासून हा शो वूट अॅपवर (Voot App) प्रसारित केला जाईल. सलमान खान टीव्हीवर हा शो होस्ट करत आहे पण ओटीटी वर तो चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) होस्ट करेल. आता 'बिग बॉस ओटीटी'चा प्रोमो रिलीज झाला आहे. या सिझनच्या ओटीटी अवतारात नवीन काय असणार आहे याची झलक कारण जोहरने प्रोमोद्वारे दाखवली आहे. नवीन प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, यावेळी शोमध्ये खूप बोल्ड आणि मजेदार टास्क असणार आहेत.
वूटवर प्रसारित होणारा हा शो प्रेक्षकांना केवळ एका तासासाठीच नव्हे तर दिवसाचे 24 तास पाहता येणार आहे. गेल्या अनेक सीझनपासून प्रेक्षक सलमान खानला हा शो होस्ट करताना पाहत आहेत. मात्र आता पहिल्यांदा हा शो टीव्हीच्या आधी OTT वर प्रसारित केला जाईल आणि करण जोहर त्याच्या OTT आवृत्तीचे सूत्रसंचालन करणार आहे. करण या नव्या भूमिकेबद्दल खूप उत्साहित आहे.
View this post on Instagram
बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर एपिसोड 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता प्रसारित होईल. तर सोमवारपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता, त्याचा नवीन भाग वूटवर प्रसारित केला जाईल. गेल्या 14 सिझन्सपासून हा शो प्रेक्षकांना आवडत आहे आणि यामुळे प्रत्येकवर्षी निर्मात्यांना काहीतरी नवीन करण्याचे आव्हान असते. अशा परिस्थितीत, ओटीटीच्या या नवीन आवृत्तीसह प्रेक्षकांना या शोमध्ये बर्याच नवीन गोष्टी पाहायला मिळतील. (हेही वाचा: Yo Yo Honey Singh च्या विरुद्ध पत्नीने दाखल केला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा; पतीवर मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप)
'बिग बॉस ओटीटी'ची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये कॉमनर्स म्हणजेच सामान्य लोक सहभागी होतील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सहा आठवडे कॉमनर्स जिंकण्यासाठी खेळातील व सहा आठवड्यांनंतर 6 स्पर्धक नवीन सेलिब्रिटी स्पर्धकांसह टीव्हीवर 'बिग बॉस 15' सुरू करतील.