बिग बॉस 12 : ...जेव्हा अनूप जलोटा 'बेबी डॉल' गातात !
अनूप जलोटा राजाच्या वेशात. (Photo Credit : Instagram)

बिग बॉस 12 मध्ये आपल्या 37 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत प्रवेश केल्यानंतर भजन गायक अूनप जलोटा चांगलेच चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरात येऊन आठवडा पण सरला नाही तर ते भजन सोडून आयटम सॉन्ग गाऊ लागले आहेत. त्यांनी सनी लिओनीचे हिट आयटम सॉन्ग 'बेबी डॉल' गायले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट होत आहे. बिग बॉस 12 : कोण आहे अनूप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन मथारु ?

बिग बॉसमध्ये 'लक्झरी बजेट' हा टास्क घरातील मंडळींना देण्यात आला होता. त्यासाठी अनूप जलोटा राजा झाले होते. तर दीपिका कक्कड आणि जसलीन मथारु या दोघी राण्या झाल्या होत्या. सर्वजण मनापासून हा टास्क एन्जॉय करत होते. टास्कसाठीच त्यांनी बेबी डॉल गायले. बिग बॉस 12 : राखीचा अनुपजींना सल्ला, 'हे' कांड करा नाही तर हाती फक्त 'लोटा'च शिल्लक राहील (व्हिडिओ)

 पाहा अनूप जलोटांच्या आवाजात बेबी डॉल...

सर्वजण एन्जॉय करत असेल तरी मात्र श्रीसंतचा राग काही शांत होण्याचे नाव घेत नाही. सबा आणि सोमी खानशी पंगा घेतल्यानंतर आता त्याचे शिवाशिश मिश्रासोबत वाजले.

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या या प्रोमोत या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.