अनूप जलोटा आणि जसलीन मथारू (Photo Credits : Instagram)

बिग बॉस 12 हे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शो मध्ये एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. पण सध्या सगळीकडे भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारु यांची चर्चा आहे. चर्चेत राहण्याचे कारणही तसे खासच आहे. गर्लफ्रेंडसोबत अनूप जलोटांच्या बिग बॉसमधील एंट्रीनंतर सोशल मीडियात विनोदांचा पाऊस

अनूप जलोटा हे ६५ वर्षांचे असून जसलिन केवळ २८ वर्षांची आहे. दोघांच्या वयात ३७ वर्षांचे अंतर असून दोघेही गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे खुद्द अनूप जलोटांनी बिग बॉसच्या मंचावर सांगितले. बिग बॉस १२ च्या घरात अनूप जलोटा घेणार सर्वाधिक मानधन

अनूप आणि जसलीन यांचे गुरु-शिष्याचे नाते होते. पण हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण ही जसलिन मथारु नेमकी आहे तरी कोण? जाणून घेऊया तिच्याविषयी...

कोण आहे जसलीन मथारु?

# जसलीन ही एक गायिका आहे. गाण्याचे शिक्षण तिने अनूप जलोटांकडून घेतले आहे.

# जसलीन सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल 42.4 K फॉलोअर्स

आहेत.

# अनेकदा ती सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड फोटोज शेअर करत असते.

# पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या जसलीनचे बालपण मुंबईत गेले आहे. लहानपणापासूनच तिला संगीताची आवड होती.

# वयाच्या १६ व्या वर्षी तिने कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट गायिकाचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर तिने मिका सिंग, सुखविंदर सिंग यांसारख्या अनेक नावाजलेल्या गायकांसोबत काम केले.

# 'लव्ह डे लव्ह डे' या अल्बममधून तिने डेब्यू केले होते. हा अल्बम तिचे वडील केस मथारु यांनी दिग्दर्शित केला होता.

# २०१३ मध्ये 'डर्टी रिलेशन' या सिनेमात तिने अभिनय केला होता. हा सिनेमानेही तिच्या वडीलांनी दिग्दर्शित केला होता.

# जसलीनचा भाऊ कंवलजीत सिंग मथारु हा देखील अभिनेता आणि निर्माता आहे.

# जसलीनची अजून एक खुबी म्हणजे ती भरतनाट्यम, बेली डान्स, हिप हॉप आणि सालसा या नृत्य शैलीत पारंगत आहे.