गर्लफ्रेंडसोबत अनूप जलोटांच्या बिग बॉसमधील एंट्रीनंतर सोशल मीडियात विनोदांचा पाऊस
अनूप जलोटा, जसलीन माथरू आणि सलमान खान (Photo Credits: Twitter)

बिग बॉस १२ हे पर्व सुरू झालं आहे. यंदा जोडीचा मामला असल्याने कोण कोणासोबत बिगबॉसच्या घरात प्रवेश करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरले आहे. १७ सेलिब्रिटींनी यंदा बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला आहे. लोकप्रिय भजन गायक अनूप जलोटा यांनी गर्लफ्रेंड जसलीन मथारूसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

अनूप जलोटा प्रसिद्धीच्या झोकात

विनम्र, वादविवादांपासून दूर शांतप्रिय व्यक्तीमत्त्व म्हणून अनूप जलोटा यांची ओळख आहे. अनूप जलोटा प्रामुख्याने भजन गायकीसाठी लोकप्रिय आहेत. मात्र बिग बॉसच्या घरात त्यांची एंट्री गर्लफ्रेंड जसलीनसोबत झाल्याने मीडीयामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. अनूप जलोटांची गर्लफ्रेंड २८  वर्षांची आहे. बिग बॉस १२ च्या घरात अनूप जलोटा घेणार सर्वाधिक मानधन

अनूप जलोटा यांची तीन लग्न झालेली आहेत. बिग बॉसमध्ये त्यांच्या होणार्‍या एन्ट्रीपासून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अनूप जलोटांनी जाहीर केलेल्या त्यांच्या आयुष्यातील रिलेशनशीप बाबतच्या खुलाशाचं पुढे काय होणार ? गेम शोचा फॉर्मेट पाहता ते किती काळ घरात तग धरू शकतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.