राखी सावंत ((Photo Credits: Facebook/ Rakhi Sawant))

बिग बॉस 12 ला सुरुवात झाली आणि पहिल्या दिवसापासूनच वादाची ठिणगी पडली. बिग बॉसच्या घरात रंगणाऱ्या वादांसोबतच स्पर्धकांच्या वैयक्तिक जीवनाचीही चर्चा होत राहते. सध्याच्या बिग बॉसमध्येही अशीच एक जोडी आहे जिच्या नात्याची चर्चा प्रत्येकाच्या ओठी आहे. ही जोडी म्हणजे अनुप जलोटा आणि 37 वर्षांनी लहान असलेली त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू. जसलीन आणि अनुपजींनी बिग बॉसच्या सेटवर त्यांच्या प्रेमाची कबूली दिली आणि अनेकांना त्याचा धक्का बसला. अनुप जलोटा खोटे बोलत आहेत असे आरोपही त्यांच्यावर झाले. मात्र नुकतेच एका टास्क दरम्यान जसलीनने त्यांचे नाते किती खरे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, आणि ही जोडी चहूबाजूंनी ट्रोल व्हायला सुरुवात झाली. यावेळी कंट्रोव्हर्सी क्वीन आणि बिग बॉसची माजी स्पर्धक राखी सावंत कशी मागे राहील. राखीने नुकतेच तिच्या इंस्टावरून काही व्हिडीओ पब्लिश केले आहेत, ज्यामध्ये ती अनुप जलोटा आणि त्यांच्या गर्लफ्रेंडला काही मौलिक सल्ले देताना दिसून येत आहे. तसेच अनुपजींना त्यांचा ‘लोटा’ सांभाळण्याची का गरज आहे हे देखील ती या व्हिडीओमार्फत सांगत आहे.

या व्हिडीओमध्ये राखीला विश्वासच बसत नाहीये की जसलीन ही अनुपजींंची गर्लफ्रेंड आहे

View this post on Instagram

 

#Bigboss12#anupjalota

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

या व्हिडीओमध्ये राखी अनुपजींच्याकडे फक्त त्यांचा 'लोटा'च का शिल्लक राहील याचे स्पष्टीकरण देत आहे.

 

View this post on Instagram

 

My new song dedicated to my friend #anupjalota #biggboss12 #jasleenmatharu #bb12

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

पहा राखीच्यामते बिग बॉसच्या घरात अनुपजींनी कोणते 'कांड' करणे अपेक्षित आहे

 

View this post on Instagram

 

#bigboss12#anupjalota

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

पहा स्वतःच्या आवाजात राखीने कोणते गाणे अनुपजींना डेडीकेट केले आहे

 

View this post on Instagram

 

My new song dedicated to my friend #anupjalota #biggboss12 #jasleenmatharu #bb12

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

जसलीनच्या घरच्यांनाही तिच्या या नात्याची बातमी धक्कादायक आहे. मात्र सध्या जसलीन बिग बॉसच्या घरात असल्याने तिच्या वडिलांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.