'All Lives Matter' म्हणत सारा अली खान हिची पोस्ट; ट्रोलिंग कमेंट्सनंतर साराकडून पोस्ट डिलिट
Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) नामक कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह सर्व जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुढारलेल्या अमेरिकत होणाऱ्या वर्णभेदावर हॉलिवूड सेलिब्रेटींसह बॉलिवूड सेलिब्रेटींही आवाज उठवला आहे. या घटनेचा निषेध करणारी पोस्ट अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने केली होती. मात्र त्यावरुन साराला चांगलेच ट्रोल करण्यात आले. त्यानंतर लगेचच तिने ती पोस्ट डिलिट केली.

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ‘Black Lives Matter’ मोहिम सुरु झाली. या मोहिमेला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. सारा अली खानने देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. मात्र त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलं. पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'Black Lives Matter'. पण ब्लॅक खोडून त्यावर ऑल लिहिण्यात आलं होतं. तसंच त्यावर विविध वर्णाच्या व्यक्तींचा हातासह हत्तीच्या सोंडेचाही फोटो होता. हत्तीच्या सोंडेचा फोटो हा केरळमधील गर्भार हत्तीणीच्या मृत्यूच्या निषेधार्थ शेअर करण्यात आला होता. मात्र यावरुन साराला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. (सारा अली खान हिने चाहत्यांसोबत शेअर केला 'Fat To Fit' पर्यंतचा प्रवास; पहा व्हिडिओ)

सारा अली खान पोस्टवरील ट्रोलर्सच्या कमेंट्स:

दरम्यान सारा अली खान हिला तिची चूक समजली आणि तिने लगेचच ती पोस्ट डिलिट केली. 'Black Lives Matter' हे भारतातील प्रकरण नाही. पण 'All Lives Matter' या संवेदनशील मुद्यावर तिने वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला हवं होतं.