सारा अली खान हिने चाहत्यांसोबत शेअर केला 'Fat To Fit' पर्यंतचा प्रवास; पहा व्हिडिओ
वाढलेले वजन, डबल चीन यांसारख्या समस्यांमधून साराही गेली आहे. परंतु, चिकाटीने मेहनत करुन तिने वजन कमी केले आणि टोन्ड बॉडी मिळवली. सारा अली खान हिने चाहत्यांसह शेअर केला 'फॅट टू फीट' पर्यंतचा प्रवास. पहा व्हिडिओ...
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली (Sara Ali Khan) खान केवळ सुंदरच नाही तर फिट देखील आहे. पण पूर्वीपासून ती इतकी फीट नव्हती हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. इंटरनेटवर सारा अली खान हिचे पूर्वीचे फोटोज किंवा व्हिडिओज आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतीलच. वाढलेले वजन, डबल चीन यांसारख्या समस्यांमधून साराही गेली आहे. परंतु, चिकाटीने मेहनत करुन तिने वजन कमी केले आणि टोन्ड बॉडी मिळवली. यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी लागते. साराने 'फॅट टू फीट' (Fat To Fit) पर्यंतचा प्रवास आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आजकाल तरुण मुलींमध्ये सामान्यपणे आढळणारी समस्या म्हणजे पीसीओडी. अर्थात Polycystic Ovary Syndrome. साराचे वजन वाढण्याचे हे एक मोठे कारण होते. साराला देखील PSOD ची समस्या भेडसावत होती. परंतु, हार न मानता आणि खचून न जाता तिने आपले वजन कमी करायला सुरुवात केली. तब्बल दीड वर्षांच्या मेहनतीनंतर तिला टोन्ड, सेक्सी बॉडी मिळण्यात यश आले. मात्र सारा फीट आणि सेक्सी झाल्यानंतर तिला कधीही तिचे जूने व्हिडिओज शेअर करताना लाज वाटली नाही, हे विशेष. काल साराने वजन कमी करण्याचा प्रवास व्हिडिओद्वारे शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, "नमस्ते दर्शको. लॉकडाऊन एडिशन एपिसोड 2: सारा का सारा टू सारा का आधा." (मातृदिन 2020 चं औचित्य साधत सोनम कपूर, विक्की कौशल, सारा अली खान यांनी शेअर केले आई सोबतचे फोटोज; भावूक मेसेजसह व्यक्त केल्या आपल्या भावना)
पहा व्हिडिओ:
'केदारनाथ,' 'सिंबा,' 'लव आज कल' या सिनेमांनंतर सारा अली खान 'कुली नंबर 1' आणि 'अतरंगी रे' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कुली नंबर 1' या सिनेमात सारा आणि वरुण धवन ही जोडी पाहायला मिळणार आहे. तर 'अतरंगी रे' सिनेमात सारा अक्षय कुमार आणि धनुष सह झळकणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2020 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

