मातृदिन 2020 चं औचित्य साधत सोनम कपूर, विक्की कौशल, सारा अली खान यांनी शेअर केले आई सोबतचे फोटोज; भावूक मेसेजसह व्यक्त केल्या आपल्या भावना
Mother's Day 2020 (Photo Credits: Instagram)

बाळाच्या जन्मासोबतच स्त्री मधील आईचा जन्म होतो. त्यानंतर तिच्यातील आई सदैव जिवंत असते. प्रत्येक वेळी आपल्या मुलाची काळजी घेणे, निःस्वार्थी प्रेम करणे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या गोष्टी ती नकळत करु लागते आणि करत राहते. तिने आपल्याला आयुष्याभर दिलेल्या अनेक गोष्टींसाठी तिला आपण धन्यवाद नक्कीच देऊ शकतो. खरंतर धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे. तिच्या उपकारातून आपली उतराई कधीच होऊ शकत नाही. मात्र तिच्या त्याग, प्रेम, कष्टाबद्दल आपण नक्कीच कृतज्ञता व्यक्त करु शकतो. याचीच एक संधी मदर्स डे निमित्त आपल्याला मिळाली आहे. परंतु, केवळ एक दिवस कृतज्ञता व्यक्त करु चालणार नाही. आपण आयुष्यभर आपल्या आईबद्दल कृतज्ञ राहाणे आवश्यक आहे. मातृदिनानिमित्त सामान्यांसह सेलिब्रिटीही आईच्या प्रेमात बुडाले आहेत. सोशल मीडियावर फोटोज शेअर करत अनेक सेलिब्रिटींनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सारा अली खान (Sara Ali Khan), सोनम कपूर (Sonam Kapoor), विक्की कौशल (Vicky Kaushal), अर्पिता खान (Arpita Khan) यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटींनी शेअर केलेले हे सर्वच फोटो अत्यंत मोहक आहेत. (मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Images, Whatsapp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन आपल्या लाडक्या आईसोबत साजरा करा हा खास दिवस!)

सोनम कपूर:

 

View this post on Instagram

 

Happy happy Mother’s Day .. love you @priya27ahuja thank you for loving me unconditionally and being my biggest support.. ❤️

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

सारा अली खान:

विक्की कौशल:

 

View this post on Instagram

 

Dodging them till date. Keep them coming Maa. Love you! ❤️

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

अर्पिता खान:

तुम्ही देखील मदर्स डे निमित्त आपल्या आईला शुभेच्छा देण्याची ही संधी अजिबात घालवू नका. सर्व गैरसमज, राग, विनाकारण आलेला दुरावा दूर करत आईला आज छानशी मिठी मारा. ते शक्क नसेल तर एखादा मेसेज पाठवून तिला आनंदीत करा.