बॉलिवूड अभिनेता इरफान खान पाठोपाठ आज सलग दुसर्या दिवशी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूड हळहळलं आहे. काही वेळापूर्वीच ऋषी कपूर यांचे स्नेही आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी I am destroyed असं म्हणत ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. अभिनेते ऋषी कपूर मागील दीड वर्षापासून कॅन्सर सोबत लढत होते. मात्र काल अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील रिलायंस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ऋषी कपूरच्या निधनाच्या वृत्तानंतर बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, रजनीकांत, प्रियंका चोप्रा, अजय देवगण यांच्यासह अनेक कलाकारांनी आपली श्रद्धांजली ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. Rishi Kapoor Dies: ऋषि कपूर यांच्या निधनावर शरद पवार, राहुल गांधी, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक; ट्विटच्या माध्यातून वाहिली श्रद्धांजली.
भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक चाहत्यांना ऋषी कपूर यांचं अंतिम दर्शनदेखील घेता येणार नाही. Rishi Kapoor Dies: अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; अमिताभ बच्चन यांंनी ट्वीट करत शेअर केली दु:खद बातमी.
रजनीकांत यांचं ट्वीट
Heartbroken ... Rest In Peace ... my dearest friend #RishiKapoor
— Rajinikanth (@rajinikanth) April 30, 2020
प्रियंका चोप्रा यांचं ट्वीट
My heart is so heavy. This is the end of an era. #Rishisir your candid heart and immeasurable talent will never be encountered again. Such a privilege to have known you even a little bit. My condolences to Neetu maam, Ridhima, Ranbir and the rest of the family. Rest in peace Sir. pic.twitter.com/TR6GVSN4m7
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2020
अक्षय कुमार यांचं ट्वीट
It seems like we’re in the midst of a nightmare...just heard the depressing news of #RishiKapoor ji passing away, it’s heartbreaking. He was a legend, a great co-star and a good friend of the family. My thoughts and prayers with his family 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) April 30, 2020
अजय देवगण यांचं ट्वीट
One blow after another. Rishi ji’s passing away is nothing short of a stab to my heart. We associated in Raju Chacha (2000) and stayed in touch through...until now. Condolences to Neetuji, Ranbir, Riddhima & Dabbooji 🙏
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 30, 2020
जेनिलिया देशमुख चं ट्वीट
I just remember meeting you a couple of months ago.. So so warm and one of the best evenings of my life with conversations straight from the heart .. Our Deepest condolences to Neetuji, RiddhimA, Ranbir and the entire Kapoor family.. Heartbroken #RipRishiji
— Genelia Deshmukh (@geneliad) April 30, 2020
बॉबी या सिनेमातून ऋषी कपूर यांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केले आहे. 40 वर्षांपेक्षा त्यांनी सिनेसृष्टीमध्ये काम केले आहे. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नितू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिधिमा कपूर आहे.