बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचं आज वयाच्या 67 व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालं आहे. मागील काही दिवस कॅन्सरशी झुंज देणार्या ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान काल रात्री त्यांना मुंबईच्या रिलायंस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांनी मुंबईच्या Reliance Foundation Hospital मध्ये अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. आज साकाळी 8.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील दोन वर्ष ते Leukemia म्हणजेच रक्ताच्या कॅन्सरने त्रस्त होते. बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. बॉबी या सिनेमातून ऋषी कपूर यांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केले आहे. 40 वर्षांपेक्षा त्यांनी सिनेसृष्टीमध्ये काम केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर गेले. मी संपलोय... असं हतबल ट्वीट करत ही दु;खद बातमी शेअर केली आहे. दरम्यान मागील वर्षभरापासून अधिक काळ अमेरिकेमध्ये ऋषी कपूर यांच्यावर कर्करोगासाठी उपचार होते. दरम्यान सध्या हॉस्पिटलमध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी नितू कपूर होत्या. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने लागोपाठ दुसर्या दिवशी बॉलिवूडच्या दुसर्या अभिनेत्याला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. काल इरफान खानचंही कॅन्सरमुळे निधन झालं आहे. कर्करोगाशी लढा देऊन 11 महिने, 11 दिवसांनतर ऋषी कपूर मायदेशी परतले; Watch Video.
Amitabh Bachchan ट्वीट
T 3517 - He's GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
ऋषी कपूर यांना सप्टेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर वर्षभरानंतर ते भारतात परतले. दरम्यान या काळातही त्यांना दोनदा हॉसपिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिल्लीत इंफेक्शन झाल्याने तर मुंबईमध्ये व्हायरल फिव्हरमुळे त्यांना काही काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
दरम्यान कपुर कुटुंबीयाने प्रसिद्ध केलेल्या नोट मध्ये ऋषी कपूर यांचे खाणं, घर, कुटुंब, सिनेमा आणि मित्रमंडळी यांच्यावर विशेष प्रेम होतं. असं सांगण्यात आलं तसंच ऋषि कपूर यांची इच्छा होती की त्यांना साश्रू नयनांनी नव्हे तर चेहर्यावर एक स्मितहास्याने अलविदा म्हटलं जावं. सोबतच चाहत्यांनी लॉकडाऊनचं भान राखत अभिनेत्याच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवहन केलं आहे.