बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन; शूजीत सरकार याने ट्विट करत दिली माहिती
Irrfan Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याचे निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी मुंबई (Mumbai) मधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) त्याने अखेरचा श्वास घेतला. काल (28 एप्रिल) त्याला प्रकृती अस्वाथ्यामुळे  कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असून त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले होते. 2018 मध्ये इरफान खान याला Neuroendocrine Tumour चे निदान झाले होते. त्यानंतर युके मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. इरफान खान यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे 'अंग्रेजी मिडियम' या सिनेमाच्या प्रमोशनलाही त्याने हजेरी लावली नव्हती.

फिल्म मेकर शुजीत सरकार यांनी ट्विट करत ही दुःखद माहिती दिली आहे. "इरफान खान हा माझा खूप चांगला मित्र होता. तो आयुष्याभर लढत राहिला आणि मला नेहमीच त्याचा अभिमान आहे." अशा आशयाचे ट्विट शुजीत सरकार यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी इरफान खान याच्या परिवाराचे सांत्वन केले आहे. तसंच आपण लवकरच पुन्हा भेटू असेही त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Shoojit Sircar's Tweet:

ANI Tweet:

इरफान खान याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी चाहत्यांसह सर्वांसाठी धक्कादायक होती. त्यानंतर इरफानच्या प्रकृती बाबत अनेक अफवा जोर धरु लागल्या. अफवांवर विश्वास ठेवू नका, इरफान अजूनही लढत आहे, असे त्याच्या प्रवक्तांकडून स्पष्ट करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी इरफान खान याची आई साईदा बेगम यांचे निधन झाले होते. मात्र परंतु, या दुःखद परिस्थितीही त्याला लॉकडाऊनमुळे आपल्या आईचे अत्यंदर्शन घेता आले नव्हते. 'लंच बाक्स', 'हिंदी मिडीयम', 'लाईफ ऑफ पाई', 'पिकू', 'मकबूल' यांसारख्या दर्जेदार सिनेमात इरफान खान याने काम केले होते.