कंगना रनौतची (Kangana Ranaut) बहीण रंगोली (Rangoli Chandel) कायमच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियाचा वापर करून ती नेहमीच अनेक मुद्द्यांवर तिची मतं मांडते, तसेच बहिणीच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट्स लिहिते. पण यावेळी मात्र तिने शेअर केलेली पोस्ट पाहून तुम्हालाही नक्कीच वेदना होतील.
रंगोलीने सोशल मीडियावर आधी तिच्या कॉलेज जीवनातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर ती लिहिते, मी शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेकांनी मला कॉलेजमधील माझा फोटो शेअर करण्यास सांगितला होता. मी सायन्सची विद्यार्थिनी असल्याने कॉलेजच्या दिवसात मला फोटो काढायला देखील वेळ नसायचा. पण ऍन्युअल डेला काढलेला हा एकमेव फोटो.
OMG !! Such an overwhelming response to our childhood pics, lot of friends asking for my pics from college, ha ha we were science students, we had no time for all this, still found one from annual day 😁 pic.twitter.com/baO8WTWYDu
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 1, 2019
कॉलेजमधील फोटो शेअर केल्यावर काहीच वेळात तिने दुसरा फोटो शेअर केला. पण हा फोटो पोस्ट करताना मात्र ती लिहिते की कॉलेजमधील फोटो काढल्यावर लगेचच मला एका मुलाने प्रोपोज केलं होतं.
Shortly after this image was clicked, the guy whose proposal I refused threw one litre acid on my face, I had to go through 54 surgeries strangely and simultaneously my little sister was physically assaulted and almost beaten to death for what ?....(contd)
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 1, 2019
Lot of people feeling sorry about the fact that I lost my beauty, honestly when your organs melt before your eyes beauty is the last thing you care about, even after 54 surgeries over a span of 5 years doctors couldn’t reconstruct my ear...(contd) pic.twitter.com/M5MMHVHpOx
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 2, 2019
परंतु मी नकार दिल्याने म्हणून त्याने एक लिटर ऍसिड माझ्या चेहऱ्यावर ओतले. आणि गेल्या ५ वर्षात माझ्यावर 54 सर्जरी झाल्या असूनदेखील डॉक्टर माझा कान व्यवस्थित करू शकले नाहीत. या घटनेमुळे मी माझा एक डोळा गमावला. रंगोलीच्या या फोटोवर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.