'कहो ना प्यार है' या चित्रपटातून पदार्पण केलेल्या आणि जगभरातील लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ने सद्य परिस्थितीत कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेला कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी 50 लाखांची आर्थिक मदत देऊ केली आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी उचलेले हे पाऊल नक्कीच स्तुत्यप्रिय आहे. तर दुसरीकडे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची पूर्वाश्रमीची पत्नी (Ex Wife) सुझान (Sussanne) ने एक आई म्हणून आपल्या मुलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय पाहून ऋतिकनेही सोशल मिडियाच्या माध्यमातून तिचे आभार मानले आहे.
ऋतिकसह घटस्फोट झाल्यानंतर सुझानने प्रथमच हा मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी ऋतिकच्या घरी परत जाण्याचा. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवला आहे. त्यामुळे ऋतिकसोबत राहत असलेली रिहान आणि रिदान यांच्या सोबत राहण्यासाठी सुझाननही काही दिवस त्यांच्यासोबत ऋतिकच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा ऋतिकची पोस्ट
सुझानच्या या निर्णयाचे ऋतिकने कौतुक केले असून तिचे आभार मानले आहे. या काळात पालक म्हणून हा तुझा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असल्याचे ऋतिकने सुझानला म्हटले आहे. आपण घेतलेला हा निर्णय हे माणुसकीचे एक उदाहरण बनेल असे सुझानने या पोस्टखाली प्रतिक्रिया दिली आहे. Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऋतिक रोशन याचे लहानग्यांना खास आवाहन (Watch Video)
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) या व्हिडिओतून ऋतिकने खास लहानग्यांना संदेश दिला आहे. ऋतिक म्हणाला की, मला ठाऊक आहे घरातील काही मोठी माणसे काही गोष्टी ऐकत नाहीत. पण तुम्ही त्यांना समजवा. घर आणि कुटुंबाच्या काळजीने ते घराबाहेर पडणार नाहीत. या परिस्थितीत घराबाहेर पडणे यात कोणतीही बहादुरी नसल्याचेही त्याने सांगितले