Hrithik Roshan (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते प्रस्थ यामुळे देशात लॉकडाऊन (Lockdown) सारखी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्यांकडून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे. यात अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यानेही उडी घेतली आहे. ऋतिकने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. तसंच विनाकारण बाहेर पडू नका असेही त्याने सांगितले. या व्हिडिओतून ऋतिकने खास लहानग्यांना संदेश दिला आहे. प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांकडे त्याने मदत मागितली आहे. ऋतिक म्हणाला की, मला ठाऊक आहे घरातील काही मोठी माणसे काही गोष्टी ऐकत नाहीत. पण तुम्ही त्यांना समजवा. घर आणि कुटुंबाच्या काळजीने ते घराबाहेर पडणार नाहीत. या परिस्थितीत घराबाहेर पडणे यात कोणतीही बहादुरी नसल्याचेही त्याने सांगितले. (Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी ऋतिक रोशन, कपिल शर्मासह कलाकार मंडळी पुढे सरसावली)

या मोठ्यांना जागे करायचे आहे, अशी कॅप्शन देत ऋतिकने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच या लढाईत तुम्ही आशेचा किरण आहात आणि हिरोही तुम्हीच आहात, असेही त्याने म्हटले आहे.

हृतिक रोशन याचा व्हिडिओ:

याशिवाय ऋतिकने कोरोना व्हायरस संबंधित जागरुकता करण्यासाठी ट्विट केले होते. तसंच या संकटावर मात करण्यासाठी त्याने मुंबई महानगरपालिकेला 50 लाखांची आर्थिक मदतही केली आहे. तसंच या संकटात महाराष्ट्र शासनाला पाठिंबा देण्याची संधी दिल्याबद्दल त्याने आदित्य ठाकरे यांचे आभारही मानले.