FIR against Kangana Ranaut: कर्नाटक (Karnataka) येथे तुमकुर मधील एका कोर्टाने शुक्रवारी चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिच्या विरोधात क्यथसांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. खरंतर कंगना रनौत हिने फार्म बिलावरुन विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. रमेश नाइल एल यांच्या द्वारे कंगना रनौच हिच्या विरोधात एफआयआर दाखल केला गेला आहे. तक्रारीत कंगना रनौत हिने गेल्या महिन्यातील एका ट्विटचा उल्लेख केला आहेत. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, अभिनेत्रीने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.(Thalaivi: 7 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'थलाइवी' चित्रपटाच्या शुटिंगसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत दक्षिण भारतात रवाना)
कंगना हिच्या विरोधातील तक्रारीत असे ही म्हटले गेले आहे की, दंगल करण्यासाठी आणि तरुणांच्या मनात असहिंसेला वाढ देण्यासाठी त्यांना उत्सकवणारी विधाने केली जात आहेत. या व्यतिरिक्त कंगना हिच्या ट्विट्समुळे विविध समूहातील लोकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. या अशा गोष्टी थांबवण्यासाठी आणि तपासण्यासाठी पोलीस अधिकारी किंवा सरकार सुद्धा कोणतीही कारवाई करत नाही आहे. यामुळे तक्रारदाराने कंगना रनौत हिच्या विरोधात आयपीएस कलम 153A, 504, 108 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल केला आहे.(Kangana Ranaut Bungalow Demolition Case: कंगना रनौत हिला BMC देणार 2 कोटी नुकसान भरपाई? बॉम्बे हार्यकोर्टाने राखून ठेवला निर्णय)
Karnataka court directs police to register FIR against actress #KanganaRanaut over her tweet allegedly targeting farmers protesting against #FarmLaws
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2020
यापूर्वी सुद्धा कंगना रनौत हिच्या विरोधात बिहार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छपरा येथील भगवान नगर मधील स्थानिक राकेश कुमार याने तक्रार नोंदवली. या तक्रारीत तक्रादाराने असे म्हटले होते की, कंगना हिने राहुल गांधी यांच्यावर टीका करताना धार्मिक भावना दुखावल्या आहेत. कंगना हिने त्याबद्दल ट्विट सुद्धा केले होते. त्यात तिने असे म्हटले की, श्रीकृष्णाची जशी नारायणी सेना होती त्याप्रमाणे पप्पूची सुद्धा चंपू सेना आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कंगना हिने महाराष्ट्र सरकारवर सुद्धा जोरदार टीका केली आहे. तसेच पाकव्याप्त कश्मीर सोबत तुलना केल्यानंतर तिच्याविरोधात संताप व्यक्त झाल्याचे सोशल मीडियात दिसून आले होते.