Kangana Ranaut Bungalow Demolition Case: बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने केलेल्या कारवाई संदर्भात हायकोर्टात खटला सुरु आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी कार्यालयातील काही भाग अनधिकृतपणे बांधल्याचे सांगत तो 9 सप्टेंबर रोजी पाडला होता. या प्रकरणी कंगना हिने महापालिकेकडे 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करत हायकोर्टात खटला दाखल केला आहे. या प्रकरणा संबंधित ताज्या अपडेट्सनुसार, बॉम्बे हायकोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला आहे.(Kangana Ranaut vs BMC: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये बीएमसीला म्हटलं महाराष्ट्र सरकारचा 'पाळीव प्राणी')
या प्रकरणी वेळोवेळी सुनावणी केली जात आहे. गेल्या वेळेस कोर्टाने प्रत्येक पक्षाला लेखी उत्तर द्यावे असे स्पष्ट केले होते. सुनावणी दरम्यान महापालिकेच्या कोणत्या वॉर्डात तिचे कार्यालय येते ते सुद्धा कोर्टाने विचारले होते. त्याचसोबत कोर्टाने असा ही सवाल उपस्थितीत केला की, ऐवढ्या मोठ्या संख्येने तेथे पोलिस का तैनात करण्यात आले होते?(Sanjay Raut On Kangana Ranaut: बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटल्यांना तोंड दिलंय, त्यामुळे मला कोणीचं थांबवू शकत नाही; संजय राऊत यांची कंगना रनौतवर खोचक टीका)
Kangana Ranaut (in file photo) property demolition matter: Bombay High Court reserves the order in the matter.
Court was informed that all concerned parties have filed their written submissions. Following this, it concluded the hearing and reserved the order. pic.twitter.com/2SM7UKJzTU
— ANI (@ANI) October 5, 2020
तर आज कोर्टाने अशी माहिती दिली आहे की, सर्व पक्षांनी आपले लिखित उत्तर सोपविले आहे. त्यानंतर सुनावणी संपली. त्यामुळे आता लवकरच कोर्टाकडून या प्रकरणी निकाल जाहीर केला जाऊ शकतो. जर निर्णय कंगनाच्या बाजूने आल्यास महापालिकेला तिच्या कार्यालावर करण्यात आलेल्या कारवाई बद्दल 2 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, सुशांत प्रकरणी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका करणाऱ्या कंगनाची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर कंगनाची तुलना पीओके सोबत केल्यानंतर वाद अधिक चिघळल्याचे दिसून आले.