Sanjay Raut And Kangana Ranaut (Photo Credits: PTI)

Sanjay Raut On Kangana Ranaut: मुंबई महानगरपालिकेने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. यात तिने BMC कडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संजय राऊत आणि संबंधित अधिकाऱ्याला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकारानंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनाला तिखट शब्दांत सुनावलं आहे.

बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले अंगावर घेतले. त्यामुळे मला कोणीचं थांबवू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने खटला दाखल केला. यात तिने मला प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी उभं राहण्यापर्यंत अनेक खटल्यांना तोंड दिलं आहे. ही गोष्ट मला माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून थांबवू शकत नाही.' (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री Rhea Chakraborty, तिचा भाऊ Showik Chakraborty यांचा जामीनासाठी Bombay High Court मध्ये अर्ज)

दरम्यान, बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबईचा उल्लेख पाकव्याक्त काश्मीर असा केला होता. त्यामुळे कंगनाच्या या वक्तव्यावर शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या काळात कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये ट्विटरवर शाब्दिक वाद झाला. या वादानंतर काही दिवसातचं बीएमसीने कंगनाचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले. त्यामुळे या प्रकरणी कंगनाने आता न्यायालयात धाव घेतली असून संजय राऊत आणि बांधकाम पाडण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिवादी केलं आहे.