Rhea Chakraborty | Photo Credits: Twitter/ ANI

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज कनेक्शन मध्ये अटकेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court)आपला जामीन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आज सत्र न्यायालयाने सलग दोनदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली आहे. आज ही वाढ 6 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या म्हणजे 23 सप्टेंबर दिवशी सुनावणी होणार आहे.

दरम्यान रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शनमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो कडून अटक करण्यात आली आहे.

ANI Tweet

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दिलेल्या नोटीशीमध्ये त्यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सोबत कूपर हॉस्पिटलमध्ये गेला होते. तेथे त्यांनी सुशांतचा मृतदेह कूपर हॉस्पिटलच्या शवागृहात पाहिला. दरम्यान या प्रकारात मुंबई पोलिस तसेच कूपर हॉस्पिटल कडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.

सध्या रिया चक्रवर्ती मुंबईमध्ये भायखळा येथील जेल मध्ये आहे. ईडी, एनसीबी आणि सीबीआय या तीन केंद्रीय तपास यंत्रणा सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी काम करत आहेत. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर राजपूत कुटुंब आणि रिया चक्रवर्ती यांच्यमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्याआरोपाच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत. दोघांनीही एकमेकांविरूद्ध आपाल्या तक्रारी पोलिस स्थानकामध्ये दाखल केल्या आहेत