सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्स म्हणून एन्ट्री केलेल्या सारा अली खानची (Sara Ali Khan) चर्चा जोरदार सुरु आहे. तसेच तिचे फॅनफोलोअर्ससुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर सारा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) नंतर आता 'या' बड्या कलाकारासोबत लवकरच तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रख्यात दिग्दर्शक डेविड धवन (Devid Dhawan) यांचा सुपरहिट चित्रपट कुली नं 1 (Cooli No. 1) याच्या रिमेकची चर्चा सुरु होती. या चित्रपटातून वरुण धवन (Varun Dhawan) मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. मात्र चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची भुमिका कोण साकारणार हे ठरविले गेले नव्हते. परंतु आता वरुण धवन सोबत कुली नं 1 या चित्रपटात सारा काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुली नं 1 चित्रपटातील संवाद फरहाद सामजी (Farhad Samji) लिहिणार असून याबद्दल फरीदून शहरयार यांनी ट्वीटच्या माध्यमातून याबद्दल सांगितले आहे.
News:@Varun_dvn and #SaraAliKhan will come together in the adaptation of #CoolieNo1 to be directed by David Dhawan ji while Farhad Samji will write the dialogues. Expected to roll by July this year.
— Faridoon Shahryar (@iFaridoon) March 22, 2019
फरहाद यांनी यापूर्वी रोहित शेट्टी ह्याचा चित्रपट 'सिम्बा'साठी संवाद लिहिले होते. मुंबई मिरर सोबत बातचीत करताना फरहाद यांनी असे सांगितले की, वरुण धवन सारख्या कलाकारासोबत काम करणे म्हणजे एका लेखकासाठी वरदान आहे. तसेच संवादामधील काही भाग त्यांनी वरुणला ऐकवली होती. त्यानंतर वरुणला संवाद लिहिलेली कॉपी पसंदीस आल्याने ती मागवून घेतली होती. परंतु या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरु झालेले नाही. तर येत्या जुलै महिन्यापासून कुली नं 1 चित्रटाचे शूटिंग सुरु होणार असल्याची शक्यता आहे.