Alia Bhatt Bikini Photo: आलिया भट्ट ने शेअर केला अंडरवॉटर फोटो; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती अनेक विविध सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांची मनं जिंकत असते. नुकताच आलियाने इंस्टाग्रामवर (Instagram) बिकिनी फोटो (Bikini Photo) शेअर केला आहे. हा अंडरवॉटर फोटो (Underwater Photo) असून यात ती एका जलपरी प्रमाणे भासत आहे. हे फोटोज तिच्या मलादीव व्हेकेशनमधील असून फोटो शेअर करताना तिने लिहिले की, "हा बेस्ट दिवस होता." (Alia Bhatt Hot Bikini Photos: आलिया भट्ट चे हॉट बिकिनी फोटोज; मालदीव मध्ये घेतेय सुट्टीचा आनंद)

या फोटोत आलियाचा जलवा पाहण्यासारखा आहे. यात आलिया तिची टोंड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. पाण्यात आलिया एखाद्या जलपरीप्रमाणे भासत असून या फोटोला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. कोणी तिला 'जलपरी' तर कोणी 'वॉटर बेबी' म्हणत आहे. (बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट च्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक SS Rajamouli ने शेअर केला Roudram Ranam Rudhiram चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक)

आलिया भट्ट पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

(Alia Bhatt आणि Hina Khan नंतर Shraddha Kapoor दिसली Underwater; शेअर केला समुद्राच्या आतील जीवनाचा खास व्हिडिओ)

आलियाने अलिकडेच तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिच्यावर मित्रपरीवार, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. करण जोहरने आलियासाठी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. त्यात आलिया, नीतू सिंह यांनी हजेरी लावली होती. मात्र रणबीर कपूर कोरोनाग्रस्त असल्याने तो पार्टीला उपस्थित राहू शकला नव्हता.