Alia Bhatt आणि Hina Khan नंतर Shraddha Kapoor दिसली Underwater; शेअर केला समुद्राच्या आतील जीवनाचा खास व्हिडिओ
Shraddha Kapoor Underwater Video (PC - Instagram)

गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींचे अंडरवॉटर (Underwater) फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चे ही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धा मालदीवमध्ये पाण्याखाली पोहताना दिसत आहे.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, श्रद्धा कपूर आधी समुद्राच्या दिशेने जात आहे आणि त्यानंतर ती समुद्राच्या आत जाते. यानंतर ती निळ्याभोर पाण्यात पोहताना दिसत आहे. श्रद्धाच्या अंडरवॉटर व्हिडिओमध्ये बरीच रंगीबेरंगी मासेही पाहायला मिळत आहेत. (वाचा - Rani Mukerji Birthday: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला अभिनय नव्हे, तर 'या' क्षेत्रात करायचं होत काम; वडिलांच्या चित्रपटातून केली करिअरची सुरूवात)

श्रद्धाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Life under water.' यासोबत श्रद्धानेही हा व्हिडिओ मालदीवचा असल्याचे सांगितले आहे. अवघ्या अर्ध्या तासात श्रद्धाच्या व्हिडिओला 2 लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. कमेंट्स करून चाहत्यांनी श्रद्धाच्या व्हिडिओचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

दरम्यान, अलीकडे हिना खान आणि आलिया भट्ट अंडरवॉटर फोटो करताना दिसल्या होत्या. त्यांचे अंडरवॉटर फोटोज चाहत्यांच्या चांगलेचं पसंतीस उतरले होते. हिना खान सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत वेळ घालवत आहे.