Alia Bhatt First Look in RRR: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट च्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक SS Rajamouli ने शेअर केला Roudram Ranam Rudhiram चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक
Alia Bhatt First Look in RRR (PC - Twitter)

Alia Bhatt First Look in RRR: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) चा आज म्हणजेच 15 मार्च रोजी वाढदिवस आहे. आलियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अभिनेत्रीचा Roudram Ranam Rudhiram चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया सितेची भूमिका साकारणार आहे. आरआरआर चित्रपटातील आलियाचा पहिला लूक आज राजामौली यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आलिया हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तिच्या समोर फूलांची टोपली दिसत आहे.

एस एस राजामौली यांनी आरआरआर चित्रपटातील आलियाचा सीतेचा लूक शेअर करताना लिहिलं आहे की, 'प्रबळ इच्छाशक्ती आणि निराकरण करणाऱ्या सीतेची रामराजाची प्रतीक्षा संपेल. तुमच्यासाठी आलिया भट्टला सीतेच्या भूमिकेत सादर करीत आहे.' (वाचा - Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या 6 व्या वर्षी केलं होत 'संघर्ष' चित्रपटात काम; रणबीर कपूरच्या आधी 'या' अभिनेत्याशी जोडण्यात आलं नाव)

या चित्रपटाचे दिग्दर्शन बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली करत आहेत. आरआरआर चित्रपटात आलिया सीता मातेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वीदेखील या चित्रपटातील सीतेचा लूक निर्मात्यांने शेअर केला होता. मात्र, यात आलियाचा चेहरा दिसत नव्हता. कारण, ती अंधारात भगवान रामाच्या मूर्तीसमोर बसली होती.

दरम्यान, आरआरआर चित्रपटात आलियाबरोबर जूनिअर एनटीआर, अजय देवगन आणि राम चरण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक पीरियड ड्रामा फिल्म आहे, ज्यात हे सर्व अभिनेते पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.