Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या 6 व्या वर्षी केलं होत 'संघर्ष' चित्रपटात काम; रणबीर कपूरच्या आधी 'या' अभिनेत्याशी जोडण्यात आलं नाव

आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईत झाला. वयाच्या सहाव्या वर्षी आलिया भट्टने अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रीती झिंटा अभिनीत ‘संघर्ष’ चित्रपटात काम केलं. या चित्रपटात तिने प्रीती झिंटाचे बालपण साकारले होते.

Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या 6 व्या वर्षी केलं होत 'संघर्ष' चित्रपटात काम; रणबीर कपूरच्या आधी 'या' अभिनेत्याशी जोडण्यात आलं नाव
Happy Birthday Alia Bhatt (PC - File Image)

Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आज म्हणजेच 15 मार्च रोजी आपला वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. आलिया ही बॉलिवूडमधील सर्वोत प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले असून तिने बर्‍याच बड्या कलाकारांसोबतही काम केले आहे. आलिया भट्ट बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला आलियाशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील जमनाबाई स्कूलमधून झाले. आलिया भट्ट लहानपणी अभिनय करण्यासाठी उत्साहित होती. याच कारणास्तव तिने बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी आलिया भट्टने अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रीती झिंटा अभिनीत ‘संघर्ष’ चित्रपटात काम केलं. या चित्रपटात तिने प्रीती झिंटाचे बालपण साकारले होते. (वाचा - Alia Bhatt ची मैत्रिण Rhea Khurana च्या लग्नात धूम; 'Genda Phool' गाण्यावर केला धमाकेदार डान्स (Watch Video))

आलिया भट्टने बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट 2012 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनीही या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटानंतर आलिया भट्टने अनेक हिट आणि उत्तम चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. आलिया भट्टनेही तिच्या जवळपास आठ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय पात्र साकारली आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर आलियाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

आलिया 'हाईवे', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियां', 'उड़ता पंजाब', 'राजी' आणि 'गल्ली बॉय' यासारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून ती बॉलिवूडच्या सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. वयाच्या 28 व्या वर्षी आलिया बॉलिवूडमध्ये डिमांडिंग अभिनेत्री बनली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आलिया भट्ट नेहमीच तिच्या लव्ह लाइफसाठी चर्चेत असते. सध्या आलियाचं नाव अभिनेते रणबीर कपूरशी जोडले जातं आहे.

दरम्यान, अनेक कार्यक्रमांमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसतात. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरचं ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, रणबीर कपूरच्या आधी आलियाचे नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशीही जोडले गेले होते. परंतु, आलिया तिच्या लव्ह लाइफबद्दल कधीही उघडपणे बोलली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2021 08:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).