Salman Khan (Photo Credits: Instagram)

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) गेले काही दिवसांपूर्वीचं डेग्यूची (Dengue) लागण झाली आहे. तरी सलमान खान वास्तव्यास असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटची (Galaxy Apartment) मुंबई महापालिकेकडून (BMC) विशेष पहाणी करण्यात केली आहे. तरी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) अडगळीच्या ठिकाणी डेंग्युच्या अळ्या सापडल्या आहेत. तरी पालिकेकडून या जागांसह संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटचं निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सलमान खानच्या घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या नसल्या तरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्याने सलमानला डेंग्युची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधीत माहिती फ्रीप्रेस जर्नलच्या (Free Press Journal) वृत्ताकडून प्रसारित करण्यात आली आहे. बीएमसी कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर (Rajendra Naringrekar) यांनी खुद्द अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सखोल पाहणी केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

राजेंद्र नारिंग्रेकर म्हणाले, “गॅलेक्सी परिसरामध्ये (Galaxy Apartment) दोन ठिकाणी डेंग्यूच्या (Dengue Larve) अळ्या आढळून आल्या. पण खान यांच्या घरी अळ्या सापडल्या नाहीत. तसेच डेंग्युच्या अळ्या सापडल्यास बीएमसी (BMC) सोसायट्यांना नोटीस पाठवत नाही त्याऐवजी आम्ही घरमालकांना त्यांच्या घरात अळ्या आढळल्यास नोटीस पाठवतो, अशी माहिती राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Bigg Boss 16 चं सुत्रसंचालन आता करण जोहर करणार, जाणून घ्या भाईजान सलमान खानने का घेतली शोमधून अर्धावरती एक्झिट?)

 

अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसचा सोळावा सिझन होस्ट करत आहे.पण शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या भागात अभिनेता सलमान खान दिसला नाही. म्हणून सलमानने अचानक या बहुचर्चित शोमधून एक्झिट (Exit) घेण्याचं कारण काय अशी सलमानसह बिग बॉसच्या फॅन्समध्ये मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) ऐवजी दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आता बिग बॉसचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. पण भाईजान सलमान खानला डेंग्युची लागण झाली असल्याने सलमान आणखी काही दिवस प्रक्षेकांना बीग बॉस होस्ट करताना दिसणार नाही.