Greaves Cotton या प्रसिद्ध इंजिनिअरिंग क्षेत्रीमधील बड्या कंपनीने Ampere Zeal नावाची इलेक्ट्रिक स्कुटी लॉन्च केली आहे. ही स्कुटी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 18 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तर फेम-2 योजनेअंतर्गत हे अनुदान मिळणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Ampere Zeal ही स्कुटी भारतीयांच्या खिशाला परवडणारी असून त्याची किंमत 66 हजार रुपये आहे. या स्कुटीचा स्पीड 55 किमी प्रती तास आहे. त्याचसोबत एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कुटी 75 किमी पर्यंत अंतर पार करु शकते. मात्र ही स्कुटी चार्ज करण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागतो. स्कुटीमध्ये ड्युअल स्पीड मोड देण्यात आले आहे. त्याचसोबत 14 सेकंदात 0 ते 50 किमी प्रती तासाचा वेगाने धावते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.(हिरोची बेस्ट सेलर बाईक Splendor ने पूर्ण केली 25 वर्षे; कंपनीने सादर केले नवे अपग्रेटेड मॉडेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)
मुख्य गोष्ट म्हणजे कंपनीने स्कुटीमध्ये अॅन्डी थेफ्ट अलार्म देण्यात आला आहे. तसेच पाच रंगामध्ये ही स्कुटी ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. कंपनीकडून ग्राहकांना या स्कुटीसाठी 3 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.