मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, ई-केवायसी करताना काही ठिकाणी चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा, यासाठी आता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
...