
हिरोने (Hero MotoCorp) आपल्या बेस्ट सेलर मोटरसायकल, स्प्लेंडरच्या (Splendor) 25 व्या वर्धापन दिनानिमित्त या गाडीचे एक नवे मॉडेल बाजारात आणले आहे. गाडीची ही विशेष आवृत्ती हीरो स्पेलेंडर प्लस आयबीएसवर (Hero Splendor Plus IBS) आधारित आहे, तसेच यामध्ये काही कॉस्मेटिक सुधारणाही केल्या गेल्या आहेत. हे नवीन मॉडेल दिल्ली आणि हरियाणामध्ये डीलरपर्यंत पोहचण्यास सुरुवातही झाली आहे. या लोकप्रिय गाडीचे विशेष-संस्करण मॉडेलचे मूल्य 55,600 रुपये आहे.
जुन्या गाडीमध्ये केल्या गेलेल्या अपग्रेड्समध्ये नवीन ऑरेंज आणि गोल्ड डेकॉल्स, फ्रंट मध्ये एएचओ (AHO) सह हॅलोजन हेडलँप, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क, एॅडजस्टेबल रियर शॉक्स आणि इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टमचा समावेश आहे.या गाडीची लांबी 2000 मिमी, रुंदी 720 मिमी आणि उंची 1,040 मिमी आहे. स्प्लेंडरच्या या स्पेशल गाडीमध्ये नवीन मोबाइल चार्जिंग सॉकट, नवीन मॅट ब्लॅक ऍलोय व्हील, ट्यूबलेस टायर्स दिलेले आहेत. (हेही वाचा: अखेर भारतात लाँच झाली BMW ची अॅडव्हेंचर बाईक; स्पीड आणि किंमत वाचून बसेल धक्का)
हिरोने मोटरसाइकलमध्ये कोणत्याही प्रकारचे मेकॅनीकल बदल केले नाहीत. स्प्लेंडर स्पेशल एडिशन मोटरसाइकल 97 CC सिंगल सिलिंडर इंजिनद्वारे पॉवर्ड आहे, जे 8.36bhp ची पॉवर आणि 8.05 NM चा पीक टॉर्क जनरेट करते. या गाडीचे इंजिन 4 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन समाविष्ट आहे. बाइकच्या समोर आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक्स दिले आहेत. स्पेशल एडिशन व्ही स्प्लेंडरचा ग्राउंड क्लिअरन्स 159 मिमी आहे आणि यात 10.5 लिटरचा फ्यूअल टँक देण्यात आला आहे. या गाडीची रिजर्व्ह कॅपॅसिटी 1.1 लिटर आहे. कंपनीचा दावा आहे की या बाइकची पेलोड कॅपॅसिटी 130 किलोग्राम आहे. स्प्लेंडरच्या या स्पेशल एडिशनची एक्स-शोरुम किंमत 56,600 रुपये आहे, जे हिरो स्प्लेंडर प्लस पेक्षा 3,540 रुपये अधिक आहे.